Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ शिंदेनी केला मोठा गैप्यस्फोट

एकनाथ शिंदेनी केला मोठा गैप्यस्फोट

मुंबई |Mumbai

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी माघारी यावे आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचार करु, असं म्हटले होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटवरुन देखील आवाहन केलं होते. आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

- Advertisement -

यामध्ये भाजपचा (BJP) आपल्याला पाठिंबा असल्याचे ते म्हणत आहेत. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा शब्द भाजपने (BJP) आपल्याला दिल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर आमदारांना सांगत आहेत.

भाजप (BJP) एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करतांना म्हणाले.

राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या