Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: "औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी"…; एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून...

Eknath Shinde: “औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी”…; एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका

मुंबई | Mumbai
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असे सांगत आहेत. असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सडकून टीका केली.

ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही राज्याच्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता ? आम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन राज्य चालवतो,सर्वसामान्य लोकांना न्याया देण्याचे काम करतोय. मी मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक योजना सुरू केल्या, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, या राज्याला विकासाकडे नेले. अडीच वर्ष आम्ही काम केले, त्याची पोचपावती म्हणून जननेते आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिले. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.

- Advertisement -

या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचा आमचा अजेंडा आहे. कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस हे ? अशी तुलना करण्यापूर्वी त्यांना जनाची नाही तर मनाची तर लाज वाटायला पाहिजे होती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा साधला. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?. तसेच औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेले कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

औरंग्याची कबर महाराष्ट्राला लागलेला कलंक
क्रूरकर्म्या औंरगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अमानूष छळ केला. औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी सुरु असलेली आंदोलने ही जनभावना आहे. औरंग्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता. देशातील सच्चा मुसलमान देखील औरंग्याचे उदात्तीकरण करणार नाही. मात्र विरोधकांचा औरंग्या नातेवाईक लागतोय का? औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायलवा हवी, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई
नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नागपूरमध्ये जमावाने काही घरांना लक्ष केले जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केले. काही लोकं जिवानीशी वाचली. पोलिसांवर दगडफेक झाली. काही लोक जखमी झाले. ही घटना पूर्वनियोजित होती असे दिसतेय, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या मोमीनपुरामध्ये घटना घडली तिथे एरवी अनेक गाड्या पार्क असायच्या, मात्र काल त्या नव्हत्या. काही मंदीरातील फोटो जाळले. अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ले केले. पोलिसांवर दगडफेक करणे हे दुदैवी आहे. समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल. नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावं शांतता राखावी, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...