Thursday, September 19, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावे लागले; शिंदेंचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावे लागले; शिंदेंचा गंभीर आरोप

मुंबई । Mumbai

- Advertisement -

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळेच राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडावं लागलं. त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) इच्छा नव्हती, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री व्हायचं, हे उद्धव ठाकरेंचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्याला जबाबदार उद्धव ठाकरे होते. १९९५ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रचार केला. त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. पण ज्यावेळी राज ठाकरे यांना पक्षात जबाबदारी देण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनातली इच्छा बाहेर आली. जशी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छ होती, तशीच त्यांची पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा जागी झाली, त्यामुळेच राज ठाकरे यांना बाजुला करण्यात आलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच, पक्षप्रमुख पदासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडून स्वत:च्या नावाचा प्रस्ताव मांडून घेतला. आणि त्यांना पक्षातून दूर करण्यात आलं. त्यानंतरही राज ठाकरे यांनी जिथे शिवसेना कमकुवत आहे, तिथे काम करण्याची तयारी दाखवली. मात्र, उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. त्यांनी राज ठाकरे यांना ती जबाबदारीसुद्धा दिली नाही. त्यामुळे राज ठाकरेंना पक्षातून बाहेर पडावं लागलं. त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी लोक आहेत. लांडग्यांच्या कळपात शिरल्यावर एकनाथ शिंदे खोटच बोलणार आहेत. एकनाथ शिंदे शिंदे हे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी लोक आहेत. हे आता त्यांच्या कळपात शिरले आहेत. लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार? एकनाथ शिंदे खोटच बोलत आहेत. राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे आमच्या सोबतच होते. तेव्हा ठाण्याच्या पुढे त्यांची काही मजल नव्हती. २५वर्षा आधीच्या राजकरण्यात त्यांचा काही सहभाग नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या