Saturday, March 29, 2025
Homeमुख्य बातम्यामंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले…

पुणे | Pune

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज पुण्यात (Pune) आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान जिवितहानी याचा आढावा घेतला. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) अनुपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे सगळे विधानसभेचे आमदार उपस्थित होते….

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्हे (Neelam Gorhe) अनुपस्थित होत्या. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) अनुपस्थित होते. शिंदे सरकारला (Shinde Government) एक महिना पूर्ण होत आहे पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, राज्यातील समस्या सोडवा, सरकारने जनता वाऱ्यावर सोडली आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

पत्राचाळ प्रकरणात संबित पात्रांची उडी, आकडेवारी जाहीर केल्याने खळबळ

बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार चांगले चालले आहे, शेतकऱ्यांना (Farmers) 50 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना थांबली होती. ती परत सुरू करण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा मुसळधार; ऑगस्ट-सप्टेंबरचा अंदाज हवामान विभागाकडून सादर

तसेच पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) कमी करण्यात आले आहे. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक छोटे-मोठे निर्णय आमच्या सरकारने घेतले आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एका चुकीमुळे अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार; अमेरिकेने ‘असे’ राबवले ऑपरेशन

मी हेलिकॉप्टर थांबवल्याची एक बातमी व्हायरल झाली आहे. पण त्याचे झाले काय, पाटण्यामध्ये एक प्रकार घडला होता. तिथे आपले मराठी कुटुंबीय होते. त्यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईत परत आणायचे होते.

जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री सत्कार समारंभात; अजितदादांचा हल्लाबोल

दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या संपर्कातील नेत्याचे एक मुंबईतील हॉस्पिटलमध्ये काम होते. त्यामुळे मला फोन करायचा होता. त्यासाठी मी पुढे जाण्याआधी हेलिकॉप्टर चालकाला थांबण्याचे आदेश दिले होते, असा खुलासाच शिंदेंनी केला.

कांदा रडवणार! शेतकऱ्यांकडून कांदा विक्री बंदचा इशारा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....