Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याShivsena Crisis : शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Shivsena Crisis : शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस; नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह (MLA) शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली होती. या फुटीमुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले असून दोन्ही गटांकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर काही आमदार आणि खासदारांनी (MLAs and MPs) एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांना नोटीसा पाठविल्या जात आहेत. अशातच आता शिंदे गटाकडून (Shinde Group) ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे…

Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी

नुकतेच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या काळात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्याकडून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना ही नोटीस पाठवली जाणार आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना

याबाबत माहिती देतांना खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, खासदार भावना गवळी या आमच्या पक्षाच्या व्हीप आहेत. लोकसभा अध्यक्षांनी त्याला अधिकृत मान्यता दिली आहे. या नियुक्तीसंदर्भात कोणत्याही न्यायालयात केस सुरु नाही. नियुक्ती संदर्भात उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही दिलेली नोटीस ही अधिकृत आहे, असे शेवाळे यांनी म्हटले.

Nashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी

तसेच देशाच्या हितासाठी जे निर्णय घेतले जातात. त्यासंदर्भात आम्ही व्हीप जारी करतो. आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे असून त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. त्यांच्या आदेशानुसारच आम्ही व्हीप जारी केला होता. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात आम्ही व्हीप जारी केला होता. या काळात अत्यंत महत्वाची विधेयके मांडली गेली. याच काळात ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मांडले गेले. ते मंजूरही झाले. हे देशभरातील महिलांच्या दृष्टीने महत्वाचे विधेयक आहे. या विधेयकासाठी आम्ही व्हीप जारी केला होता. मात्र, तो काही खासदारांकडून पाळला गेला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

Nashik Rain News : नाशिकमध्ये सकाळी ऊन तर दुपारी पाऊस; नागरिकांचे हाल

दरम्यान, या नोटीशीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, “ते आम्हाला काय व्हीप बजावणार? २०२४ नंतर हे लोक कुठेच नसतील. आता असलेल्यांपैकी एकही खासदार संसदेत नसेल .मुख्यमंत्र्यांसह (CM) एकही आमदार विधानसभेत नसेल, हे पक्के आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यंदा Oscars 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार मल्याळम सिनेमा ‘2018- Everyone is a Hero’

- Advertisment -

ताज्या बातम्या