Monday, November 18, 2024
Homeराजकीयसहकार क्षेत्रातील उद्योगांना घरघर

सहकार क्षेत्रातील उद्योगांना घरघर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात 40 ते 50 वर्षापूर्वी सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ जुन्या जाणत्या नेत्यांनी रोवली होती. त्यातून शेतकर्‍यांची समृद्धी आणि विकासातून अनेक गावे समृद्ध झाली.

जिल्हा बँक, दूध संघ आणि मुक्ताई सूतगिरणी असे बोटावर मोजण्या इतपत संस्था वगळता इतर उर्वरित उद्योगांना भाडेतत्त्वावर देण्याची वेळ आली आहे. याला शासन धोरणांसोबतच अनेक कारणे असून विजेचे दर आणि उद्योग व्यवस्थापन यंत्रणा देखिल काही अंशी जबाबदार असल्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

परंतु, कालांतराने या सहकार विश्वाला घरघर लागली असून यातील बहुतांश उद्योग बंद पडले आहेत. जिल्हयात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणार्‍या वसंत, बेलगंगा, चोपडा येथील साखर कारखान्यासोबतच चाळीसगाव, नगरदेवळा, भुसावळ, चोपडा आदी ठिकाणी असलेल्या सूतगिरण्या देखील आज बंद अवस्थेत आहेत.

रावेर, जामनेर वा अन्य ठिकाणचे साखर कारखाने सुरू होवू शकले नाहीत. तर मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याची मागणी संचालकांकडून केली जात आहे.

सहकार क्षेत्रातील उद्योग व्यवसाय बंद पडण्यास आणि भाडेतत्वावर देण्याची वेळ येण्यास अनेक कारणे आहेत. यापैकी व्यवस्थापनाचा अवाजवी खर्च, अयोग्य निर्णय, मोजक्या मनुष्यबळावर उद्योग चालविण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

शासनाची धोरणे कर्ज मागणीपोटी जिल्हा बँकांकडून पतपुरवठा केला जातो. परंतु, यास शासनाची थकहमी असणे गरजेचे आहे. गत शासन काळात मधुकर साखर कारखान्याला थकहमी दिलेली नाही.

त्यामुळे साखर कारखान्यांचा उत्पादित माल पडून असल्याने कर्जाचे प्रमाण वाढते रहाणे, गैरव्यवस्थापनचा निर्णय, मोठया प्रमाणावर कर्मचारी आस्थापना असल्याने वेतनांवर आणि व्यवस्थापकीय खर्चावर नियंत्रण नसणे, तर ऊस कारखान्यांच्या संदर्भात क्षेत्रांतर्गत असलेल्या उसाच्या वाहतुकीस आणि क्षेत्राबाहेरील वाहतुक खर्च, क्रशिंगवर परीणाम होतो.

शिवाय विजेचे दर दिवसेंदिवस वाढते आहेत, मुक्ताई सुतगिरणीसह जिल्हा सहकारी बँक आणि दूध संघ हे दोन सहकार तत्वावरील संस्थामधे व्यवस्थापनावरील अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवल्याने संस्था अ दर्जाप्राप्त असून नफ्यात आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या