Wednesday, September 11, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून

धक्कादायक! शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून

वैजापूर | प्रतिनिधी | Vaijapur

शेतीच्या वादातून वयोवृद्ध पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी वैजापूर शहरात कोर्टाच्या मागील गेट समोर घडली. याबाबत सविस्तर माहिती,

- Advertisement -

केसरबाई कारभारी गवळी (वय 63 वर्षे राहणार भिंगी बोरसर) यांचा भर दिवसा सकाळी साडेअकराच्या दरम्यान तिचा पती कारभारी किसन गवळी वय 70 वर्ष याने तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

केसरबाई या कारभारी गवळी या आरोपीची पहिली पत्नी असून त्यांचे कोर्टात घायगाव शिवारात असलेल्या शेतीचा वाद सुरू होता. केसरबाई ही पहिली पत्नी असल्या कारणाने कारभारी आणि त्याचे पटत नव्हते. त्यामुळे कारभारी याने दुसरा विवाह केला होता. तसेच केशरबाई ही 40 वर्षापासून तिच्या माहेरी म्हणजे भिंगी बोरसर ह्या ठिकाणी राहत होती. वीस पचवीस वर्षापासून त्यांचे शेतीच्या वादातून कोर्टात भांडण चालू होते. त्यात कोर्टाने केसरबाई यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे कारभारी गवळी यांच्या मनात राग होता. आरोपी कारभारी गवळी याने वरील कोर्टात आपिल केले होते. त्यामुळे केसरबाई ही कोर्टाच्या तारखेला आलेली असताना आज सकाळी सुमारे साडेआकरा वाजेच्या दरम्यान तिचा पती कारभारी किसन गवळी याने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यात छातीवर पाठीमागे व हाताला चाकूचे वार केले. त्यात ती मरण पावली.

यावेळी आरोपी सोबत आणखी सह आरोपी देखील होते. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून याबाबत पोलीस निरिक्षक अनंत कुलकर्णी हे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या