Friday, November 22, 2024
Homeजळगावअनिल पाटलांना ७१ हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून द्या - गिरीश महाजन

अनिल पाटलांना ७१ हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून द्या – गिरीश महाजन

अमळनेर | प्रतिनिधी –

लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांच्या मतदारसंघात ७१ हजारांचा लीड स्मिताताईंना मिळाला , आता उपकाराची परतफेड म्हणून अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला ७१ हजार पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा आहे. जेव्हढा जास्त लीड तेवढे मजबुत खाते अनिल पाटलांना मिळेल. त्यामुळे २० तारखेला घड्याळ चिन्हाचे जास्तीत जास्त बटन दाबून महायुतीला निवडून आणा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमळनेर येथील महायुतीच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. जळगाव जिल्ह्यात संपूर्ण ११ जागांवर विजय मिळविण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, अमळनेरची जनता विकासाच्या मागे उभी राहणारी आहे. अनिल दादा पण निवडणार आणि आपले सरकार पण बसणार असे त्यांनी सांगितले.
मंत्री अनिल पाटील म्हणाले की, आज जमलेली प्रचंड गर्दी २३ तारखेला विजयी मिरवणुकीचा संदेश देणारी असून अमळनेरच्या कार्यकर्त्याला कामासाठी कोणाच्या वशिल्याची गरज नाही. अमळनेर येथील राजमाता जिजाऊ सुतगिरणीला मिळालेला पैसा कोल्हापूर कडे कसा वळवला गेला. घोटाळा झाल्याचे दाखवून भावनिक आवाहन व्हिडीओ द्वारे करण्यात आले. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल पाटील यांनी ना महाजन यांच्याकडे केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी सांगितले की भाजप ,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीन पक्ष म्हणजे घड्याळाचे तीन काटे आहेत. ते एकत्र आले म्हणजे बारा वाजतात. येत्या २० तारखेला एकत्र येत घड्याळाचे बटन दाबा म्हणजे विरोधकांचे बारा वाजतील.

यावेळी सेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार, रिपाई चे यशवंत बैसाणे, देविदास देसले, गौरव महाजन, रामकृष्ण पाटील, अरुण पाटील, दिनेश शेलकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. यावेळी मंचावर माजी जि प सदस्य ऍड. व्ही. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सौ जयश्री अनिल पाटील, विनोद भैय्या पाटील, भारती सोनवणे, प्रवक्ता योगेश देसले, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, सेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, शहर प्रमुख संजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक आदी उपस्थित होते.

ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिरीष चौधरी यांचे नाव न घेता आमचे डमी उमेदवार म्हणून अफवा पसरवली जात आहे. मात्र आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. आमचा उमेदवार अनिलदादाच आहे. आपली ताकद त्यांच्याच पाठीशी उभी करून त्यानाच निवडून द्यावे असे आवाहन ना महाजन यांनी केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या