Friday, March 14, 2025
Homeदेश विदेशकाँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ आणि भुपेश बघेल कुठून लढणार?

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ आणि भुपेश बघेल कुठून लढणार?

नवी दिल्ली | New Delhi

येत्या काही दिवसात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार (5 State Elections) आहेत. मध्य प्रदेशच्याही (Madhya Pradesh) निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress Declared List Of Candidate) केली आहे.

- Advertisement -

पहिल्या यादीत मध्य प्रदेशातील १४४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर छत्तीसगडसाठी ३० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाजा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण येथून निवडणुकीच्या मैदानात उतरतील.

काँग्रेसनेही छत्तीसगडसाठी आपल्या ३० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगढ येथून निवडणूक लढवणार आहेत तर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव त्यांच्या पारंपरिक जागा अंबिकापुर येथून निवडणूक लढवणार आहे. याखेरीज दुर्ग ग्रामीण येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ताम्रध्वज साहू हे देखील निवडणूक लढवणार आहे.

राऊळमधून माजी खासदार मंत्री जितू पटवारी यांना तिकीट देण्यात आले आहे. आगर माळवामधून विपन वानखेडे आणि सुसनेरमधून भेरू सिंग परिहार बापू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दीपक बैज यांना चित्रकोटमधून तिकीट देण्यात आले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jayant Patil: ‘आधी माझी ग्यारंटी घेऊ नका’…; अन् ‘आता बाहेर बोलायची...

0
बारामती | Baramatiराष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील...