Wednesday, November 20, 2024
Homeक्राईमनिवडणुकीच्या धामधुमित हद्दपार आरोपी पकडले

निवडणुकीच्या धामधुमित हद्दपार आरोपी पकडले

तडीपारच्या आदेशानंतर घुसखोरी || भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून जिल्ह्यात वावरताना दिसत आहे. ते आपल्या हद्दीत लपून छपून वास्तव्य करत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात असे गुन्हेगार हद्दीत आल्याने त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी दोन हद्दपार गुन्हेगारांना भिंगार हद्दीत पकडले. त्यांच्याविरूध्द कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सराईत गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी व समाजात कायदा व व्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात येते. हद्दपार आदेश पारीत झाल्यानंतर त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण निश्चित करून पोलीस त्यांना त्या ठिकाणी सोडतात. दरम्यान, हे गुन्हेगार परत जिल्ह्यात येत असल्याचे आढळून आले आहे. विधानसभा निवडणुक सुरू असून अशा हद्दपार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक हद्दपार व्यक्तींचा शोध घेत असताना हद्दपार इसम शुभम उर्फ शिवम उर्फ मडक्या मारूती धुमाळ (रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर) हा त्याच्या राहत्या घरी आलेला आहे, अशी माहिती मिळाली.

पथकाने त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील आन्या ऊर्फ आनंद राजेंद्र नायकु (रा. नेहरू चौक, माळ गल्ली, भिंगार) याला अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त घालत असताना हद्दपार गुन्हेगार आन्या ऊर्फ आनंद नायकु हा भिंगार हद्दीत आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या