जळगाव । प्रतिनिधी jalgaon
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांचा प्रचार धूमधडाक्यात चालू असून, ते स्वतः महायुतीच्या शिलेदारांसह अवघ्या 12 दिवसांत तब्बल 121 गावांमध्ये भगव्या वादळाची तुफान लाट पोहचली असून प्रचारा दरम्यान एकेका गावात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचा झंकार, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गावागावात उमटलेली धनुष्यबाणची गर्जना यामुळे मतदार संघात जिकडे तिकडे भगवामय वातावरण आहे. महिला कार्यकर्त्यांचा उत्साह तर विशेष लक्षणीय आहे. गुलाबभाऊंच्या नावाने गावा – गावात स्वागताची लाट उसळली असून कार्यकर्त्यांनी जबरदस्त प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे.
प्रतापराव व विक्की बाबा यांचा डोर-टू-डोर गाठी भेटी
शेकडो तरुणांच्या सोबतीने त्यांचे दोन पुत्र जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि लघु उद्योजक विक्की बाबा या दोन्ही भावंडांनी पायाला भिंगरी लावून जळगाव व धरणगाव तालुक्यातील धरणगाव शहरासह डोर-टू-डोर गाठी भेटी घेत 63 गावं पिंजून काढली. विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ देण्याचे आवाहन करत आहेत. प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील एकूण 63 गावांमधून पिंजून काढताना विकास कामांसाठी जनतेचे आशीर्वाद व खंबीर साथ देण्याचे आवाहन ते करीत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा
- जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांच्या यांच्या नेतृत्वात हा पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉक्टर बी.बी.भोसले जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील व सदस्य उपस्थित होते. युवा नेतृत्व तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून ऋण व्यक्त केले आहे.