Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनिवडणूक निरीक्षकांनी दिले ‘मर्यादित’ मद्य विक्रीचे आदेश

निवडणूक निरीक्षकांनी दिले ‘मर्यादित’ मद्य विक्रीचे आदेश

नाशिक। प्रतिनिधी Nashik

ऐन विकेंडला नाशिकमधील वॉइन शॉपमध्ये मर्यादेत दारुची विक्री झाल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली. कारण निवडणूक निरीक्षकांनी अचानक मद्य दुकानदारांना ‘ठराविक’ मद्यसाठा विकण्याचे आदेश परवानाधारकांना दिले आहेत. दरम्यान, देशी दारुची विक्री अचानक काही पटीने वाढली आहे. संबंधितांकडून मतदारांना हे मद्य पाेहाेचविले जात असल्याचा संशय यंत्रणेला आला आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांना विक्रीस मर्यादा दिली आहे. त्यानुसार देशी-विदेशी व बियर ही मर्यादित विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शहरातील बरीच मद्य विक्री दुकाने शनिवारी (दि. ११) सायंकाळी बंद झाली. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या अधीसूचनेनुसार दहा बॉक्स देशी दारु, पस्तीस बॉक्स खोके विस्की, तीस बॉक्स बिअर विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सायंकाळनंतर मद्यपींची वाइन शॉपवर गर्दी झाली. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीसूचनेनुसार मद्यविक्रीची मर्यादा ओलांडल्याने दुकाने बंद करण्यात आली.

बऱ्याच दुकानांनी मर्यादेपेक्षा जास्त दारु विकल्याचाही दावा करण्यात आला. मद्यविक्रीची अधिकृत दुकाने बंद झाल्याने सायंकाळी साडेसातनंतर अवैधरित्या विक्री होणाऱ्या मद्यसाठ्याच्या अड्ड्यांवर नागरिकांचा जमाव दिसला. तिथे मात्र पोलिस किंवा उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यात असमर्थता दर्शविल्याचे दिसले.

- Advertisment -

ताज्या बातम्या