आश्वी (वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ११० वर्ष जुन्या ऐतिहासिक अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील सेवा सहकारी सोसायटीची पहिल्यादाच पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली असून १३ जागांसाठी ४५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ अर्ज बाद झाल्याने ४३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटात सत्तास्थापनेसाठी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने गावात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
Lata Mangeshkar : लता दीदींना जेवणातून दिलं गेलं विष, तीन महिने सुरु होते उपचार
आश्वी खुर्द सेवा सोसायटीला ऐतिहासिक महत्त्व असून मागील ११० वर्षांत येथे एकदाही निवडणूक झालेली नाही. यावेळी मात्र आ. विखे पाटील व ना. थोरात यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील ८ जागांसाठी आ. विखे गटाकडून विजय माधवराव भोसले, मोहित गंगाधर गायकवाड, सुरेश बाबुराव गायकवाड, विठ्ठल बजाबा गायकवाड (दोन अर्ज), राजेंद्र प्रभाकर मांढरे, ज्ञानेश्वर प्रभाकर खर्डे, भाऊसाहेब संपत शिंदे, निलेश बाळासाहेब भवर, चंद्रकांत त्रिंबक सोनवणे, प्रशांत निळकंठ कोडोंलिकर, रमेश शिवाजी सोनवणे, स्नेहलकुमार विजय भवर, दिनकर गणपत गायकवाड तर ना. थोरात गटाकडून दत्तात्रय किसन मांढरे, पांडुरंग भागाजी गायकवाड, रमेश विठ्ठल गायकवाड, भाऊसाहेब बाबुराव सोनवणे, संजय गबाजी भोसले, बापूसाहेब माधव भवर, अमोल प्रमोद गायकवाड, विठ्ठल मारुतराव गायकवाड, कुणाल दिलीप डुबे, विठ्ठल त्रिंबक गायकवाड, बाळासाहेब कुंडलिक गायकवाड, संपत भिमाजी शिंदे तसेच विकास साहेबराव गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सर्वसाधारण गटातून २६ जण रिंगणात उतरले आहेत.
मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’
महिला राखीव प्रवर्गातून दोन जागांसाठी आ. विखे गटाकडून शोभाताई बाळासाहेब गायकवाड, रुपाली शैलेश गडकरी, दिशा दत्तात्रय गायकवाड, सुरेखा प्रकाश गायकवाड तर ना. थोरात गटाकडून सुनीता रमेश गायकवाड, खतीनाबी छन्नुभाई सय्यद, मंगलबाई गायकवाड अशा ७ जणींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी आ. विखे गटाकडून जगदीश अन्तोन मुन्तोडे, राजेंद्र अन्तोन मुन्तोडे, याकूब चंदू मुन्तोडे तर ना. थोरात गटाकडून पांडुरंग आप्पा बर्डे हा एकमेव व एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?
इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी आ. विखे गटाकडून दत्तात्रय बापूसाहेब गायकवाड तर ना. थोरात गटाकडून संजय गबाजी भोसले असे दोन अर्ज दाखल झाले असून भ. जा. वि. ज प्रवर्गातील एका जागेसाठी आ. विखे गटाकडून भास्कर पांडुरंग वाल्हेकर, प्रदीप नामदेव वाल्हेकर तर ना. थोरात गटाकडून मयुर गणपत वाल्हेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान ११० वर्षानंतर पहिल्यादांच निवडणूक होऊ घातली असल्याने गावातील राजकीय वातावरण चागलेच तापले असून माघारीच्या दिवशी (दि. १८ फेब्रुवारी) चित्र स्पष्ट होणार आहे.
आश्वी खुर्द सेवा सोसायटीची मोठ्या प्रमाणात इमारतीसह जागा असूनही त्या जागेचा व्यावसायिक वापर न झाल्याने गावातील अनेक सुशिक्षित तरुणांना बेरोजगार राहावे लागले आहे.
PHOTO : पंढरपुरात लगीनघाई..! फुलांचा महाल, विठ्ठल-रुक्मिणीला खास पोशाख
संपूर्ण महाराष्ट्रात रेशनचे धान्य सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून वितरीत केले जाते. मात्र आश्वी खुर्द सेवा सोसायटीला परवडत नसल्याने धान्य दुकान खाजगी व्यक्तीला चालवायला दिले गेले तर सभासद संख्येत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न न केल्यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर असल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.