Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : पहिली सलामी हरियाणाने दिली आहे दुसरी….; हरियाणा निकालावरुन देवेंद्र...

Devendra Fadnavis : पहिली सलामी हरियाणाने दिली आहे दुसरी….; हरियाणा निकालावरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

मुंबई | Mumbai
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर हरियाणाने विश्वास दाखवला. कुठल्याच विरोधी पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. लोकसभेत आम्हाला फेक नॅरेटिव्हने हरवले. फेक नॅरेटिव्हचे उत्तर आता थेट नॅरेटिव्हने दिले. साठ वर्षांनंतर तिसऱ्यांदा एक पक्ष हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे तो पक्ष म्हणजे तुमची आणि भारतीय जनता पार्टी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फडणवीस म्हणाले, हरियाणात मागच्या निवडणुकीत आपल्याला ४० जागा मिळाल्या होत्या. यावेळी आपण सर्व रेकॉर्ड तोडून ५० जागा मिळवल्या. ६० वर्षानंतर कोणता तरी पक्ष तीन वेळा हरियाणात जिंकत आहे. खेळाडूंना घेऊन रान पेटविण्यात आले. शेतकऱ्यांवरून सरकारविरोधात आरोप करण्यात आले. पण या सर्व मुद्द्यांना मतदारांनी नाकारले. देशातली जनता मोदींच्या पाठीशी आहे. विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर राहुल गांधी नौटंकी करत आहेत. राहुल गांधी यांना पहिली सलामी हरियाणाने दिली आहे दुसरी सलामी महाराष्ट्र देणार आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे. हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे.

- Advertisement -

पुढे ते बोलताना असे ही म्हणाले, मी केवळ हरियणाचं बोलणार नाही तर जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तिथे भारत आणि लोकशाही जिंकली आहे. कारण जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील त्यांनी येऊन बघावं की आम्ही काश्मीरमध्ये निवडणूक घेऊन दाखवली. कुठलीही भीती किंवा तत्सम वातावरण कुठेही नव्हतं. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका आपण घेऊन दाखवल्या. आंतराराष्ट्रीय जगतात पाकिस्तान जे सांगत होता की सेनेच्या माध्यमातून कब्जा केला आहे. त्या पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण घेऊन दाखवली. जगाने मान्य केलं की ३७० कलम हटवणं योग्य होतं. जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे. असं देवेंद्र फडणवीस आहे. जम्मू काश्मीरमध्ये सरकार कुणाचं बनणार हे महत्त्वाचं नाही. असंही फडणवीस म्हणाले.

आज मी मोदींचे आभार मानतो तसंच देशभरातल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सकाळी ९ वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करुन बसला होता. काय काय बोलू आणि काय नाही असे झाले होते. आज भोंग्याला विचारायचे आहे आता कसे वाटतेय? कारण जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेले लोक आहेत. जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांनाही टोला लगावला. आज भोंग्याला कसे वाटते आहे? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या