नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केंद्र सरकारच्या एन कॅपच्या योजनेतून (Schemes of N Cap) 25 इलेक्ट्रिक बस (Electric bus) खरेदीला नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (Nashik Metropolitan Transport Corporation) संचालक मंडळाने गुरुवारी (दि. 23) प्रशासकीय मंजुरी दिली.
सिटीलिंककडून (Citylink) 25 बससाठी मार्चमध्ये निविदाप्रक्रिया (Tender process) राबवली जाणार आहे. त्यामुळे सिटीलिंकच्या ताफ्यात आता लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून, शहराचे प्रदूषणही (Pollution) कमी होण्यास मदत होणार आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिल्याने शहरात आता इलेक्ट्रिक बसही धावणार आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
या इलेक्ट्रीक बसेस (Electric buses) ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (Gross Cost Contract) (जीसीसी) तत्त्वावर ठेकेदाराकडून चालवल्या जाणार असून, केंद्र सरकारचे मिळणारे प्रतिबस अनुदान (subsidy) थेट ठेकेदाराला वळते केले जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक (Public transport) सुधारण्यासाठी महापालिकेने आठ जुलैपासून सिटीलिंक ही शहर बससेवा सुरू केली आहे. या बससेवेअंतर्गत दोनशे बस सीएनजी (CNG) आणि पन्नास डिझेल बस जीसीसी तत्त्वावर चालविण्यात येत आहेत.
एन कॅप निधीचा वापर
महापालिकेने ’एन कॅप’ अर्थात नॅशनल एअर क्लीन मिशन योजनेअंतर्गत बसची संख्या 50 वरून 25 पर्यंत घटवत त्या संदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. ’एन कॅप’मधून महापालिकेला दरवर्षी 20 ते 22 कोटींचा निधी हवा व्यवस्था शुद्धतेसाठी मिळत असतो. या निधीतून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.एन कॅप योजनेअंतर्गत केंद्राकडून गेल्या तीन वर्षांत महापालिकेला आतापर्यंत 66 कोटींचा निधी मिळाला आहे.