Saturday, May 4, 2024
Homeनगरइलेक्ट्रिक मोटर चोरणारे दोघे जेरबंद

इलेक्ट्रिक मोटर चोरणारे दोघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान दोन संशयीतांना पकडले होते. त्यांनी नगर तालुक्यातून इलेक्ट्रिक मोटारी चोरल्याची कबूली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सागर बाळासाहेब सोनसळे व राहुल नंदराव पवार (दोघे रा. आठवड ता. नगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

- Advertisement -

Video : डोंगराईचा हिरवा शालु व वाहणारे झुळूक पाणी

चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील शिवाजी नाथा भद्रे यांच्या शेतातील विहिरीतून इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेली होती. या प्रकरणी भद्रे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

पंढरपूर येथून परतणार्‍या पाथर्डीच्या वारकर्‍यांच्या वाहनास अपघात

सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार घोरपडे, शैलेश सरोदे, रावसाहेब खेडकर, रमेश शिंदे यांच्या पथकाने गस्तीदरम्यान सागर व राहुल यांना पकडले होते. त्यांचेकडे तपास करून त्यांच्याकडून चोरलेली इलेक्ट्रिक मोटर जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या