Saturday, May 4, 2024
Homeनगरइलेक्ट्रिक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद

इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतावरील ईलेक्ट्रीक मोटार (Electric Motor), केबल चोरी (Cable Theft) करणार्‍या दोघांसह चोरीचा माल विकत घेणारा श्रीरामपूर (Shrirampur) येथील भंगार दुकानदाराला (Scrap Shop) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक (LCB Police Arrested) केली आहे. आकाश गोरख बर्डे (वय 24 रा. कुरणवाडी, बारगाव ता. राहुरी), सागर गुलाब बर्डे (वय 24 रा. गुणवाडी ता. नगर) व भंगार दुकानदार जमील इब्राहिम शहा (वय 44 रा. वार्ड नंबर दोन, ता. श्रीरामपूर) अशी अटक (Arrested) केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

त्यांच्याकडून 31 हजार 400 रूपये किमतीचे तांबे मिळून आल्याने ते हस्तगत करण्यात आले आहे. 7 जून रोजी प्रदीप छगन नागवडे (वय 35 रा. गुणवडी) यांच्यासह शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक मोटारी (Electric Motor) व केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

कोपरगावच्या दर्शनाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांची पाच पथके

त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे पथक काम करत होते. या पथकाने माहिती काढून सदरचा गुन्हा करणारा संशयीत आकाश बर्डे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचे साथीदार सागर बर्डे (रा. गुणवडी), नवनाथ ऊर्फ वीर पवार (पसार), साईनाथ पवार (पसार), शक्तीमान गायकवाड (पसार), सोमनाथ गायकवाड, (पसार) व अरूण बर्डे (पसार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्यांचा शोध घेतला असता सागर गुलाब बर्डे हा मिळुन आला. त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरी (Theft) केलेली केबल वायर जाळुन त्यातील तांबे बेलापुर (ता. श्रीरामपूर) येथील जमील शहा (भंगार दुकानदार) यास वेळोवेळी विक्री केल्याची माहिती दिल्याने जमील इब्राहिम शहा याच्याकडे चौकशी केली असता त्याने केबल वायर भंगारात घेतल्याची कबुली दिल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. तिघांना अटक (Arrested) करून नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मित्रानेच केला मित्राचा खूनअवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून युवकाचा खुन 15 लाखासाठी विवाहितेचा छळ

- Advertisment -

ताज्या बातम्या