Friday, October 2, 2026
HomeनगरNewasa : विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

Newasa : विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

पावसामुळे विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरल्याने शाळेतून घरी येत असलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील सुरेगावगंगा येथे घडली.

- Advertisement -

याबाबत बाळासाहेब उत्तमराव गायकवाड (वय 38) धंदा-शेती रा. सुरेगावगंगा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यात म्हटले की, दि. 4 जुलै रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास मी आमचे सुरेगावगंगा शिवारातील शेतात काम करत असताना तेथे जवळच माझा पुतण्या श्रणव प्रवीण गायकवाड (वय 12) हा शाळेतून गाडीतून उतरुन पायी चालत घरी येत असताना पावसामुळे विजेच्या खांबामध्ये करंट उतरुन शॉक लागून बेशुद्ध झाला.

तेव्हा आम्ही त्यास खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे घेवून आलो असता तेथील डॉक्टरांनी श्रवणला तपासून तो औषधोपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....