Wednesday, September 30, 2026
HomeनगरPathardi : विजेची सर्विस वायरचा शॉक लागू महिलेचा मृत्यू

Pathardi : विजेची सर्विस वायरचा शॉक लागू महिलेचा मृत्यू

भावाचे पूरात वाहून गेलेले घर संसार पाहण्यासाठी आल्या होत्या तिसगावमध्ये

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तिसगावमधील गुरुवारपेठ नदी पात्रालगत वस्तीत भावाच्या घराची पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या बहिणीला विजेच्या तारेचा (सर्विस वायरचा) शॉक बसून त्यात तिचा मृत्यू झाला. बुर्‍हाणा सिकंदर शेख (वय-55) रा. इंदिरानगर पाथर्डी असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजेदरम्यान त्या तिसगावमध्ये गुरूवारपेठे असलेला आपल्या भाऊ हसन पठाण यांच्या घराची पूराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.

- Advertisement -

यावेळी खा. निलेश लंके, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू होता. घटना घडल्यानंतर सचिन खंडागळे, दिनेश ससाणे यांनी यांनी वीज प्रवाह खंडीत करून मदत कार्य केले. शॉक बसलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी पाथर्डी येथे हलविले होते. तेथे तपासणी अंती मयत घोषित करण्यात आले. घटननेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत अर्धातपास रास्तारोको आंदोलन केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...