Monday, March 31, 2025
Homeभविष्यवेधअग्नितत्त्वाचे प्रतिनिधी विजेची उपकरणे

अग्नितत्त्वाचे प्रतिनिधी विजेची उपकरणे

घरांमध्ये विजेचे उपकरण आम्ही आपल्या सोयीनुसार लावतो. जर यांना अनुकूल दिशेत लावण्यात आले तर जीवनात समाधान राहते आणि आरोग्यावर देखील याचा प्रतिकूल प्रभाव पडत नाही. मग ते विजेचे मीटर असो किंवा फ्रीज, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर टीव्ही किंवा विजेची इतर उपकरणे, त्यांना लोक आपल्या सुविधेनुसार घरात जागा देतात. पण वास्तू म्हणतो की जर यांना योग्य दिशेत स्थान दिले तर जीवनात अधिक सुविधा राहते.

ज्या प्रकारे ईशान्य कोपरा आणि उत्तर-पूर्व दिशेचा संबंध आर्थिक समृद्धीशी निगडित असतो, तसेच आग्नेय कोन अर्थात दक्षिण-पूर्व दिशेचा संबंध आरोग्याशी निगडित असतो. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व करणारी ही दिशा विजेचे उपकरण ठेवण्यासाठी सर्वोचित समजली जाते. घरात प्रवेश बनवण्यासाठी किंवा बोअरवेल आणि शयन कक्ष बनवण्यासाठी ज्या प्रकारे आम्ही वास्तूच्या नियमांचे अनुसरण करतो, त्याच प्रकारे विजेच्या उपकरणांना स्थापित करण्यासाठी वास्तू सिद्धान्ताकडे लक्ष ठेवणे फारच गरजेचे आहे.

- Advertisement -

वास्तूनुसार उत्तर-पूर्वेनंतर दक्षिण-पूर्व दिशांचे महत्त्व आहे. या कोपर्‍याला वास्तुदोषांपासून मुक्त ठेवणे आवश्यक आहे. ही दिशा अग्नितत्त्वाची जागा आहे. म्हणून विजेची सर्व उपकरणे आणि मीटर, विजेचे नियंत्रण आणि वितरण येथूनच असायला पाहिजे. ज्याने अग्नितत्त्वाचे संतुलन कायम ठेवू शकतो.

अग्नितत्त्वाचे असंतुलित होणे बर्‍याच प्रकारच्या आजारांना आमंत्रण देते. जर या दोषांचे निवारण नाही केले तर बर्‍याचवेळा साधारण आजारपण देखील गंभीर रूप घेऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना असहनीय त्रास सहन करावा लागतो. विजेचे उपकरण जसे इनव्हर्टर, ट्रांस्फार्मर, फ्रीज इत्यादी उष्मा अर्थात हिट उत्पन्न करतात, म्हणून वास्तुशास्त्रात यांच्यासाठी आग्नेय कोन अर्थात दक्षिण-पूर्व दिशा योग्य मानली गेली आहे. स्वयंपाकघरासाठी देखील ही दिशा उपयुक्त मानली गेली आहे. तर जाणून घेऊ आग्नेय कोपर्‍याशी निगडित सामान्य वास्तू दोष आणि त्याच्या निवारणाचे उपाय.

जर एखादी व्यक्ती या दिशेच्या चुकीच्या प्रयोगामुळे वास्तू दोषाने ग्रस्त घरात राहत असेल तर पुढे दिलेल्या उपायांचा वापर करून त्या दोषांच्या नकारात्मक प्रभावाने ती मुक्त होऊ शकते.

अग्नितत्त्वाच्या असंतुलनामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासंबंधी त्रास, वैवाहिक आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी अग्नितत्त्वाला शांत करणे आवश्यक असते. त्यासाठी दक्षिण-पूर्व कोपर्‍यात सरसोच्या तेलाचा दिवा लावायला पाहिजे.

सूर्योदयाच्या वेळेस दक्षिण-पूर्व कोपर्‍यात पूर्वेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप केल्याने देखील फायदा होतो.

घराच्या सर्व खोल्यांमध्ये या दिशेला नियंत्रित ठेवून घराच्या दक्षिण-पूर्व कोपर्‍यात उपस्थित वास्तुदोषाचे निवारण करण्यात येते. वॉशिंग मशीन, फ्रीज इत्यादींना दक्षिण-पूर्व कोपर्‍यात ठेवल्याने देखील वास्तुदोष दूर होऊ शकतो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladaki Bahin Yojana : दीड हजार लाडक्या बहिणींच्या नावे चारचाकी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारकडून महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील महिलांची पडताळणी राज्य पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. यासाठी...