Wednesday, November 6, 2024
Homeनगरश्रीरामपूर महावितरणच्या कार्यालयास भाजपाने ठोकले कुलूप

श्रीरामपूर महावितरणच्या कार्यालयास भाजपाने ठोकले कुलूप

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्यावतीने टाळे ठोको हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्याचं अनुषंगाने श्रीरामपूर भारतीय

- Advertisement -

जनता पार्टी शहर व तालुक्याच्यावतीने भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोको हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मेनरोड साळुंके बिल्डिंग येथील महावितरण वीज कार्यालयास कुलूप लावण्यात आले व निदर्शने करून महावितरण व आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. संबंधित महावितरण अधिकारी कांबळे यांना निवेदन देखील देण्यात आले.

महावितरणकडून राज्यभर 75 लाख वीजग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीसा पाठवून 4 कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचं पाप हे आघाडी सरकार करू पाहत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार, व्यवसाय बंद असताना देखील या महावितरण व आघाडी सरकारने वीज ग्राहकांना अव्वाचे सव्वा वीजबिल पाठवून दिले. आधीच या आघाडी सरकारने हे करोना काळातील वीजबिल जनतेला माफ करू, अशी घोषणा केली आणि आता त्या घोषणेवर ते घुमजाव करून आता त्यांनी वीजकनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. या विषयाला धरूनचं आज श्रीरामपूर भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलनात भाजपा उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामभाऊ तरस,

महेश खरात, भटक्या विमुक्त जाती जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजक बंडूकुमार शिंदे, बेलापूर शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, अजित बाबेल, विजय लांडे, विशाल अंभोरे, विशाल यादव, अक्षय वरपे, पुरुषोत्तम भराटे, रुपेश हरकल, योगेश ओझा, रवि पंडित, मिलिंद साळवे, राकेश कुंभकर्ण, किशोर खरवंडे, अशोक मुळे, सुहास पंडित, मच्छिंद्र हिंगमीरे, दिनेश दळवी, बाळासाहेब डफळ, कैलास हेबळे, देवा चावरिया, सचिन दळवी, किरण तरटे, जालिंदर निकाळजे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या