Monday, June 15, 2026
Homeनगरशॉक लागल्याने दोघांचा मृत्यू

शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू

पारनेर तालुक्यातील घटना || पोलीसात गुन्हा दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) तालुक्यातील हंगा व रांजणगाव रोड येथील दोन वेगवेगळ्या घटनेत विजेचा धक्का (Electricity Shock) लागून दोघांचा मृत्यू (Death) झाला. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार पहिली रांजणगाव रोड येथे घडली आहे. यात संतोष विठ्ठल ढगे (वय 50) रा. रांजणगाव रोड हे मयत झाले आहेत. यांना राहत्या घरीच विजेचा धक्का (Electricity Shock) बसला. त्यांना कुटुंबियांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. कृष्णा कणसे यांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

दुसरी घटना हंगा येथे घडली असून याबाबत कैलास शिवाजी दळवी यांनी सुपा पोलिस ठाण्यात (Supa Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गणेश भास्कर दळवी (वय 36) हे सोमवार (दि.25) रोजी रात्री हंगा शिवारातील घराजवळील पोल्ट्री फार्मवर झोपण्यासाठी गेला असता रात्री 9 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 7 च्यादरम्यान विजेचा धक्का लागून मयत आढळून आला. याबाबत सुपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरिक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संपत खैरे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...