Saturday, July 27, 2024
Homeनाशिकयेवल्यात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी आणीबाणी; गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी

येवल्यात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी आणीबाणी; गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी

येवला | प्रतिनिधी

पावसाळा सुरु होऊन तीन महिने संपले आहेत तरीही येवला तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मुसळधार व समाधानकारक पाऊस पडलेला नाही त्यामुळे तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ्यात सुरु झालेल्या सुमारे २० टँकरद्वारे ५० खेपा करुन ३२ गावे व १५ वाडी-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात असून अजून २ गावांनी टँकर सुरु करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असल्याने प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या आदेशानुसार गावांच्या मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येईल असे रफिक शेख पाणीपुरवठा विभाग प्रमुख पंचायत समिती येवला यांनी सांगितले.

यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे नदी,नाल्यांना पूर आले नाही. बंधारे,विहिरी,तलाव अद्यापही कोरडेठाक आहेत. साधारणपणे काही गावांना मार्च महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवून पाणी टंचाईच्या झळा बसू लागतात. त्यामुळे एप्रील,मे दरम्यान तालुक्यातील पूर्व भागातील गावांच्या मागणीनुसार टँकर सुरु करण्यात आलेले असून पावसाळ्यात ते बंद करण्याएैवजी दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी जैसे थे ठेवण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.

आहेरवाडी,जायदरे,रेंडाळे,चांदगाव,ममदापूरतांडा,खरवंडी,देवदरी,वसंतनगर,अनकाई,भगतवस्ती,चव्हाणवस्ती,जाधववस्ती,वाघवस्ती,गोरखनगर,गोरेवस्ती,बोराडेवस्ती,सायगाव,महादेववाडी,नगरसूल,निलकवस्ती,महालगाव,कोतकर,येवले,जाधव,भनगडेवस्ती,लहीत,हडपसावरगाव,पांजरवाडी.

तसेच, पिंपळखुटेबु,भुलेगाव,कासारखेडे,कोळगाव,वाईबोथी,कोळमखु,कोळम बु.,आडसुरेगाव, गारखेडे, सोमठाणजोश,रहाडी,वाघाळे,देवठाण,नायगव्हाण,राजापूर,अलगट वस्ती, वाघवस्ती, हवालदारवस्ती, विंचुवस्ती, सावरगाव, संभाजीनगर, पन्हाळसाठे,धनकवाडी,धामणगाव,नगरसूल मुळबाईघाट,कटकेवस्ती,कापसेवस्ती,महादेवनगर.

यासोबतच, गणेशनगर,मानमोडी,माळवाडीपुर्व/पश्‍चिम, रावतेवस्ती,शेखवस्ती,फरताळवाडी पश्‍चिमपुर्व,डोंगरेवस्ती,मोठामळा,चिखलेवाडी,विलासखैरणारवस्ती,दादमळा,सोनवणेवस्ती,पहाडेवस्ती आदी गावे,वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.तर मातुलठाण व खैरगव्हाण येथे टँकर सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती येवला यथे दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या