Friday, April 25, 2025
Homeनगरमानधनावर होणार शिक्षकांची नियुक्ती

मानधनावर होणार शिक्षकांची नियुक्ती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यात सुमारे 70 ते 80 शिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली. जिल्ह्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या किती शाळा आहेत, याची माहिती देखील मागविली आहे. तसेच पात्रताधारक डीएड व बीएड उमेदवारांकडूनही अर्ज मागविले आहेत. खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षे वयोगटांतील उमेदवार पात्र आहेत.

- Advertisement -

मागासवर्गीयांमध्ये वयोमर्यादा 43 वर्षांपर्यंत पात्र असेल. ज्या शाळेत नियुक्ती होणार असेल, तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील. त्यानंतर, तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार आहे. ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. तिला मुदतवाढीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल. नियुक्त उमेदवारांना प्रतिमहिना 15 हजार रूपये मानधन मिळेल. या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त होणार आहे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील यांनी ही माहिती दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...