Thursday, June 20, 2024
Homeनगरक्लासच्या फीचे पैसे घेऊन कर्मचार्‍याचे पलायन

क्लासच्या फीचे पैसे घेऊन कर्मचार्‍याचे पलायन

पाच लाखांची फसवणूक || तोफखाना पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

येथील आकाश बायजूस कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍याने विद्यार्थी व पालकांकडून घेतलेली क्लासची तीन लाख 85 हजार 477 रुपयांची फी कंपनीकडे जमा न करता पसार झाला आहे. तसेच तो दोन लॅपटॉप व एक टॅब घेऊन गेला आहे. कंपनीची चार लाख 75 हजार 477 रुपयांची फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी बायजूस कंपनीचे नगर ब्रँच मॅनेजर मृत्युंजय तापेश्वर सिंग (वय 51 रा. तपोवन रस्ता, सावेडी, मूळ रा. मोरवाडी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी सचिन भागीरथ भटाटे (मूळ रा. इगतपुरी) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ही घटना घडली. 7 जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन भटाटे याने आकाश बायजूस कंपनीच्या क्लासची फी म्हणून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून तीन लाख 85 हजार 477 रुपये स्वतःच्या खात्यात तसेच रोख स्वरूपात घेऊन ते पैसे कंपनीकडे जमा न करता फसवणूक केली तसेच विश्वासाने त्यांच्या ताब्यात दिलेले दोन लॅपटॉप व एक टॅब असा एकूण चार लाख 75 हजार 477 रुपयांचा ऐवज स्वतःच्या वापराकरिता घेऊन पळून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार देवराम ढगे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या