जळगाव jalgaon । प्रतिनिधी
मान्यता प्राप्त संघटनेशी करार केल्याचा राग मनात धरुन एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीतील (Raymond Company) कर्मचार्यांनी (Employees) कंपनीच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत कंपनीतील मशिनरी बळजबरीने बंद (shut down machinery) पडल्याची घटना शुक्रवारी घडली. तसेच कामगारांना कंपनीत अडकवून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी दहा कर्मचार्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात रेमंड कंपनीत करारनाम्यावरुन वाद उफळून आला आहे. अडीच महिन्यात दुसर्यांदा हा वाद सुरु असून आता रेमंडमधील कामगार संघटनेकडून जून्या करारनाम्यावर स्वाक्षरी घेतली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी कामगार उत्कर्ष सभेचे जितेंद्र जोशी हे कंपनीत आले होते. त्यांनी कर्मचार्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचार्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जोशी यांनी त्याठिकाणाहून काढता पाय घेतला होता. तेव्हा पासून कंपनीत कामबंद आंदोलन सुरु असून हे आंदोलन बेमुदत सुरु राहणार असल्याचा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला आहे.
या कर्मचार्यांनी घातला गोंधळ
कंपनीतील कामगार जगदिश तुकाराम बोरोले (वय- 50, रा. ओम नगर डी.एन.सी. कॉलेज), किशोर मुकूंदा पाटील (वय- 55, रा. विठ्ठलपेठ), अनिल भास्कर चौधरी (वय- 55, रा. अयोध्यानगर), चंद्रकांत पितांबर लोखंडे (वय- 44, रा. योगेश्वर नगर), चेतन विनोद पाटील (वय- 37, रा. पाटीलवाडा मेहरुण), योगेश्वर क्रिष्णा कोल्हे (वय- 59, रामपेठ, कोल्हेवाडा), हर्षल वासूदेव नेहते (वय- 34, रा. माऊलीनगर खेडी शिवार), संदीप पुंडलिक कोल्हे (वय- 46, रा. रामपेठ कोल्हेवाडा), मयूर किसन चौधरी (वय- 33, रा. नारखेडे वाडा, भादली, ता. जळगाव), राकेश पुंंडलिक कोल्हे (वय- 50, रा. रामपेठ कोल्हेवाडा) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कामगारांना काम करण्यास केला मज्जाव
कंपनीतील कामगारांनी जितेंद्र जोशी यांच्या मान्यताप्राप्त संघटनेशी करार केल्याचा राग मनात धरुन यांनी कंपनीविरूद्ध मोठमोठ्याने घोषणा बाजी केली. तसेच कंपनीत काम करणार्या कामगारांच्या मशिनरी बळजबरीने बंद करुन त्यांना काम करण्यास मज्जाव केला. तसेच त्यांचा रस्ता अडवून त्यांना अटकावून ठेवले होते. याप्रकरणी सिक्युरिटी ऑफिसर गिरधारी मारोती कुर्वे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.