Thursday, June 20, 2024
Homeनाशिकबचतगटातून महिलांचे सक्षमीकरण गरजेचे : खोदाना

बचतगटातून महिलांचे सक्षमीकरण गरजेचे : खोदाना

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

- Advertisement -

येणार्‍या निवडणुकांमध्ये (election) शिवसेनेचा (shiv sena) भगवा झेंडा फडकवण्यासाठी महिला आघाडीने सज्ज राहावे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दोन वर्षात केलेली विकास कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावे, त्याच बरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण (Empowerment of women) होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देवळाली मतदारसंघाच्या (Deolali constituency) शिवसेना संपर्कप्रमुख संगीता खोदना (sangita khodana) यांनी केले.

नाशिक (nashik) तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने परिषद महिलांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) महा साहेब मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीता खोदाना, जिल्हाप्रमुख मंदाताई दातीर, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, लिलाबाई गायधनी,गायत्री पगार, नवनाथ गायधनी, सरपंच सुरेखा गायधनी, ज्योती भागवत, माजी नगरसेविका भारती ताजनपुरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महिला आघाडी संपर्कप्रमुख संगीता खोदाना पुढे म्हणाल्या की, महिलांनी बचत गट तयार करून त्याद्वारे नुसते पैशाची बचत अथवा कर्ज वाटप न करता महिलांनी छोटे-मोठे उद्योगधंदे उभारनी करून तयार केलेल्या मालाची विक्री बाजारपेठेत विक्री करावी आणि स्वतःच्या पायावर उभे राहून स्वयंभू व्हावे असे सांगत शासनाच्या योजनांचा देखील बचत गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले, तर तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के म्हणाले की,

शिवसेना (shiv sena) हा एक विचार असून हा विचार महिलांनी सर्वसामान्यांच्या मनात रुजवावा आणि येणार्‍या निवडणुका (election) स्वबळावर लढण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे असे सांगत प्रत्येक महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली विकास कामे शासनाच्या माध्यमातून राबवलेल्या योजना याची माहिती द्यावी असे सांगितले.

यावेळी मंदाताई दातीर, माजी नगरसेविका भारती ताजनपुरे, ज्योती भागवत, भारती गायधनी,साधना चौधरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.महिला मेळाव्याच्या दरम्यान आशा सेविकांनी कोरोणा काळात केलेल्या कामांची दखल घेत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गौरव करण्यात आला. तर कार्यक्रमांच्या प्रारंभी आयोजक शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख गायत्री पगार यांनी प्रस्ताविकातून महिलांच्या समस्या आणि त्याच्या समोरील आवाहने यासंबधी माहिती दिली.

कार्यक्रमांस उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, पंचायत समिती उपसभापती उज्वला जाधव, नगरसेवक सुनील गोडसे, बाजीराव जाधव, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गायधनी, राहुल धात्रक आदींसह असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.सुत्रसंचालन व आभार दिलीप गायधनी यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या