Wednesday, May 22, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

दहशतवाद्यांशी (terrorists) झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात शुक्रवारी घडली आहे.

- Advertisement -

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम जिल्ह्यातील हलान वनक्षेत्रात शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवांनाना वीरमरण आले आहे. ही शोध मोहीम सुरूच असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.

‘देशदूत’चा आज ‘गुरू सन्मान पुरस्कार’ सोहळा

परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे. हलान वनक्षेत्रात शोध मोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी क्रॉस फायरिंग केले आणि या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. यावेळी सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची अधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

उपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

- Advertisment -

ताज्या बातम्या