Friday, June 20, 2025
Homeनगरअतिक्रमण करणारे आमच्यावर का सोडता ?

अतिक्रमण करणारे आमच्यावर का सोडता ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा कर्मचार्‍यांना (Municipal Employees) काही सांगायचे की नाही? आमच्याच अंगावर अतिक्रमणधारक (Encroachment Holder) सोडतात. अतिक्रमण काढायची जबाबदारी कर्मचार्‍यांची नाही का?, असा संतप्त सवाल विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर (Sampat Baraskar) व स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे (Kumar Wakale ) यांनी सोमवारी मनपा महासभेत केला.

- Advertisement -

जिल्ह्यातील धरणातील वाचा पाणीसाठा !

शहरातील विकास कामांना अडथळे ठरणार्‍या कोणत्याही अतिक्रमणाची (Encroachment) तक्रार केली व ते काढण्याची मागणी केली तर तक्रार केल्यानंतर दहाव्या मिनिटाला अतिक्रमण धारक आमच्याकडे येतो व आमची तक्रार का केली, असे सवाल आम्हाला करतो. आमच्यावर अतिक्रमणवाले सोडण्याचा हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणीही बारस्कर व वाकळे यांनी केली.

गोदावरीत 10272 क्युसेकने विसर्ग जायकवाडीत 19 हजारने आवक

मागील 15 सप्टेंबरला आयोजित मनपाची महासभा (Municipal General Assembly) मोकाट कुत्रे विषयावरून गाजली व नंतर तहकूब झाली. ती महासभा सोमवारी महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सभा अजेंड्यावरील विषयांपेक्षा अवांतर विषयांवरच सभेची सुरुवात झाली.

टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महाल (Bhistabagh Mahal) रस्ता खराब झाला असून, आमच्या प्रभाग एकसाधे पॅचिंगही होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी बारस्कर यांनी केली. यावर, आयुक्तांकडे तसा प्रस्ताव सादर करतो, असे आश्वासन शहर अभियंता मनोज पारखे यांनी दिले. पाऊस थांबताच खड्डे बुजविण्यासाठी काम सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार कर्तृत्ववान, त्यांना कोण डावलणार- बावनकुळे

काम लगेच होणार नाही…

एमआयडीसी (MIDC) परिसरातील बोल्हेगाव रस्ता (Bolhegav Road) फक्त खोदून ठेवला आहे व काम होत नाही. ठेकेदाराला 40 लाख बिल दिले. जिथे खोदला आहे, तिथे आधी रस्त्याचे काम सुरू करा, अशी मागणी वाकळे यांनी केली. निवडणुका तोंडावर आल्या असून आम्हाला वॉर्डांत फिरायचे आहे. त्यामुळे गांभीर्याने घ्या. खड्डे भरण्यासाठी मुरूम (Murum) आणि पाणी पुरवठा दुरुस्ती साहित्य मिळत नाही. ठेकेदार व पुरवठादार साहित्य देत नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. त्यानंतर याच परिसराच्या अनुषंगाने मदन आढाव (Madan Adhav) यांनी समस्या मांडल्या. या भागातील शाळा पाण्यात आहे. तेथील पाणी काढले जात नाही. डीपी रस्ता आहे. त्यातून पाणी काढा. ड्रेनेज लाईन टाका, अशी मागणी त्यांनी करताच शहर अभियंत्याने लगेच होणार नाही, असे भाष्य करताच आढाव संतप्त झाले व आम्ही काय मूर्ख आहोत का? अशी उत्तरे कशी देता? शाळा पाण्यातच ठेवायची का?

बोल्हेगाव रस्त्याचा (Bolhegav Road) विषयही तसाच प्रलंबित ठेवल्याचा दावा केला. यावर नगर रचना विभागाचे सहायक संचालक राम चारठाणकर यांनी चर्चेत सहभागी होत, संबंधित डीपी रस्त्याची जागा संपादित करून ताब्यात घ्यावी लागेल. जागा मालकाची परवानगी घेऊन ड्रेनेज लाईन टाकावी लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर आयुक्त डॉ. जावळे (Commissioner Dr. Pankaj Jawale) यांनी जागा मालकाची उद्याच बैठक घेतो व बळजबरीने भूसंपादन (Land Acquisition) करायची गरज असल्यास त्याबाबतही निर्णय घेतो, असे स्पष्ट केले. त्यानंतर महापौर शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी खोदलेल्या रस्त्यातील पाणी काढून तेथे खडी टाकायची व्यवस्था करण्याची सूचना केली.

संगमनेर खुर्द येथील हत्याप्रकरणी 3 आरोपी जेरबंद

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...