Sunday, September 15, 2024
HomeनाशिकTrimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर येथे नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर येथे नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

- Advertisement -

येथे श्रावण महिन्यात (Month of Shravan) गर्दी (Crowd) होत असल्याने भाविकांना (Devotees) येथील रस्त्यात (Road) असणाऱ्या अतिक्रमणांमुळे (Encroachments) पायी चालतांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) भर रस्त्यात काही व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने पादचारी व वाहनांना जागाच शिल्लक नसते. रोजची भाविकांची वाढणारी गर्दी व मोठी अनास्था हे त्र्यंबकनगरीचे समीकरण ठरलेले आहे…

Trimbakeshwar News : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घेतला त्र्यंबकेश्वर येथील श्रावणमासाच्या नियोजनाचा आढावा

अशातच आता श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर पूर्वी शिकाऊ उपजिल्हाधिकारी यांनी ज्या धर्तीवर अतिक्रमण हटविले होते. त्याच धर्तीवर आज सकाळी त्र्यंबक नगरीमधील (Trimbak Nagari) भर रस्त्यातील अतिक्रमणे आणि टपऱ्या काढून घ्यावात व रस्त्यातील व्यवसाय हटविण्यात यावे अशी जाहीर सूचना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून रिक्षाद्वारे शहरात (City) देण्यात आली. त्यानंतर दुर्लक्ष करणाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात करण्यात आली.

Video : १२ महिने विहिरी कोरड्या, टँकरनेच भागते तहान; येवल्यातील ‘हा’ भाग अजूनही पाण्यापासून वंचित

ही अतिक्रमण हटाव मोहीम त्र्यंबक नगरपरिषदेच्या (Trimbak Municipal Council) प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रिया देवचके, बांधकाम विभागाचे विजय सोनार, अभियंता इनामदार, स्वच्छता विभागाचे ठाकरे, मुख्यलिपिक संजय मिसर व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी राबविली. यावेळी जेसीबीद्वारे (JCB) रोडवरील टपऱ्या तोडण्यात आल्या. त्यामुळे भर रस्त्यात दुकाने असलेल्या व्यावसायिकांची (Professionals) पळापळ झाली. तसेच अनेकांनी स्वता:हून टपऱ्या व रस्त्यात असलेले सामान काढून घेतले. तर अनेकांनी रस्त्यातील टपऱ्या व साहित्य न काढल्याने नगरपरिषदेने ते तोडून टाकले. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी जाऊन केला गौरव

दरम्यान, अधिक श्रावणमासात त्र्यंबकेश्वरमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले. त्याची पुनरावृत्ती श्रावण महिन्यात नको म्हणून उशिरा का होईना त्र्यंबक नगरपरिषदेने सुरु केलेली अतिक्रमण हटाव मोहीम नियमित स्वरुपात राहिल्यास त्र्यंबकनगरीचा बकालपणा थांबविण्यासाठी मदत होईल नाहीतर अतिक्रमणांचा नेहमीचा प्रश्न तसाच राहण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik News : तलाठी परीक्षा गैरप्रकार प्रकरण; संशयित निघाला मास्टरमाईंड, चौकशीसाठी पथक रवाना

- Advertisment -

ताज्या बातम्या