Friday, April 25, 2025
Homeनगरअनधिकृत प्रार्थनास्थळावर हातोडा

अनधिकृत प्रार्थनास्थळावर हातोडा

सिध्दटेकच्या मंदिराजवळील अतिक्रमण आ. जगताप यांनी हिंदूत्वादी संघटनेच्या प्रतिनिधींसह स्वत: जाऊन काढले

अहिल्यानगर/ कर्जत |प्रतिनिधी| Ahilyanagar| Karjat

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ काही व्यक्तींनी अनधिकृतपणे बांधकाम उभारून हा भाग वक्फ बोर्डाचा असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष वेधल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आ. जगताप यांनी गुरूवारी आक्रमक भूमिका घेत निवडक कार्यकर्त्यांसह थेट सिद्धटेक गाठले. यावेळी त्यांच्यासमवेत श्रीराम प्रतिष्ठानचे राज्याचे अध्यक्ष सागर बेग व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरासमोरील अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा टाकत ते पाडून टाकले. आ. जगताप यांनी स्वतः हातात दंडूका घेत करण्यात आलेले अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी जय श्रीराम… जय बजरंगबली.. अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामानंतर येथील प्रार्थनास्थळी एका समाजाकडून प्रार्थनाही सुरू झाल्याचे लक्षात येताच येथील ग्रामस्थांनी ही बाब हिंदुत्ववादी संघटना, तसेच आ. जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना व आ. जगताप यांच्याकडून संबंधित अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यासंदर्भात कर्जत महसूल विभाग, जिल्हा महसूल व पोलीस प्रशासनाला कळविले होते. परंतु त्यानंतर देखील या अतिक्रमणाविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर आ. जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह गुरूवारी सिद्धटेक गणपती मंदिरा समोरील त्या अनधिकृत बांधकामावर स्वतः हातोडा उगारत ते जमीनदोस्त केले.

यावेळी आ. जगताप माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ज्या-ज्या ठिकाणी असे अनाधिकृत बांधकामे असतील ते प्रशासनाने कारवाई करून काढावे, अन्यथा आम्ही ते स्वतः काढू. जिल्ह्यात काही गटांकडून हिंदुंच्या धार्मिक स्थळांजवळ अशा प्रकारचे अनाधिकृत कृत्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. ते हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारे आहेत. आता आम्ही सहन करणार नाही त्यांना जाशास तसे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रशासनाला आली ऐनवेळी जाग !
दरम्यान आ. जगताप व हिंदुत्ववादी संघटनाकडून या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात कळविले होते. मात्र, कोणतीच हालचाल न करणार्‍या स्थानिक प्रशासनाला ऐनवेळी जाग येत दोन दिवसांपूर्वी संघटना आक्रमक झाल्याचे समजताच संबंधित अतिक्रमनाला शेंदूर लावला. मात्र, गुरूवारी आ. जगताप यांच्यासह हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सदरचे अतिक्रमण जमीनदोस्त केले.

घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त
सिद्धटेक येथे गणपती मंदिराबाहेर असलेल्या त्या विवादित जागेवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना देखील कोणताही त्रास होऊ नये, याची देखील यावेळी दक्षता घेण्यात आली. यावेळी आ.जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदूत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...