धुळे Dhule। प्रतिनिधी
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) कार्यकारी अभियंत्या वर्षा महेश घुगरी (Executive Engineer Varsha Mahesh Ghugri) या अधिकाराचा दुरूपयोग करून अधिकारी व कर्मचार्यांचा छळ करीत आहेत. अनेक वेळा असंसदीय आणि खाजगी कामे सांगतात. नकार दिल्यास कारवाईची धमकी देतात. त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना एकप्रकारे नजरकैदेतच ठेवले आहे. त्यांच्या या विक्षिप्त आणि मनमानीविरोधात आज विभागातील अभियंते (Divisional Engineers)आणि कर्मचर्यांनी एकजुट दाखवित कार्यकारी अभियंत्यांना (Executive Engineers) निवेदन दिले. या नऊ पाणी निवेदनातून त्यांनी कसा छळ होतो, असे सविस्तरपणे मांडले आहे. तरी सौ. घुगरी यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची विभागीय चौकशी होऊन शिस्तभंगाची कार्यवाही(Disciplinary proceedings) करावी, अशी मागणी केली आहे.
Photos # आपत्ती व्यवस्थापनासाठी रासेयोचे विद्यार्थी सज्ज राहतील : राज्यपाल
निवेदनाची प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव, सह सचिव, अधीक्षक अभियंता यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांना दिल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. घुगरी या धुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असतांना तेथील जि.प. सदस्य, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना त्यांनी दिलेल्या वाईट व अपमानास्पद वागणुकीमुळे सौ.घुगरी यांच्याविरुद्ध सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव केला होता. त्यानुसार सीईओंनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर म.ना.से. अधिनियमानुसार त्यांची बदली अथवा पदस्थापना अकार्यकारी पदावर अपेक्षित असतांना सौ. घुगरी यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभुमीचा गैरफायदा घेऊन स्वतःची नेमणुक कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, धुळे या अतिशय महत्वाच्या व संवेदनशील पदावर करुन घेतलेली आहे.
सुरेश दादांना भेटून नवीन ऊर्जा मिळाली : वैशालीताई सूर्यवंशी VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ
या पदावर त्यांना सुमारे अडीच वर्ष झाले आहे. येथे काम करीत असतांना देखील त्यांनी त्यांची कार्यशौली बदललेली नाही. हजर झाल्यापासुन त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्यांना अतिशय मनमानी पद्धतीने स्वत:ची खाजगी संस्था, मालमत्ता असल्याप्रमाणे अत्यंत वाईट वागणुक देत आहेत. तसेच अधिकारी व कर्मचार्यांवर दबाव यावा, त्यांचा खाजगी वावर, एकांतता नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणालीचा दुरुपयोग केलेला आहे. मंजुरी न घेता शासकीय नियमावलीचा प्रत्येक ठिकाणी भंग केलेला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांना नजरकैदेत असल्यासारखे कार्यालयाच्या आवारात वावरावे लागते. सीसीटीव्ही संचालन त्यांनी गोपनियरीत्या त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवलेले आहे. त्यांनी काही अभियंत्यांच्या घरी जावून कुटुंबासमोर त्यांना मारहाण केलेली आहे.
VISUAL STORY : ब्रायडल वेशभुषेतील चंदना कोणाची वाट पाहतोय बरे…
तसेच सौ.घुगरी या कारण नसतांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील पती व मुलांच्या वादविवादाबाबत जबरदस्तीने चर्चा घडवून विषय ऐकण्यास भाग पाडतात. विरोध केल्यास कर्मचार्यांचा अपमान करतात. तांत्रिक कामाबाबतच्या बैठकीत त्यांच्या घरगुती विषयावर चर्चा करतात. कर्मचार्यांना खाजगी कामे सांगतात. दोष नसतांना नाहक मानसिक त्रास देतात. तसेच सौ. घुगरी या प्रत्यक्ष कामांच्या स्थळांना कमी भेटी देतात. तांत्रिक अडचणीबाबत मार्गदर्शन दिले जात नाही. आपली जबाबदारी टाकून विनाकरण अधिकारी आणि कर्मचार्यांना दोषी धरले जाते.
3 व वर्ग-4 कर्मचार्यांना असंसदीय/खाजगी कामे न केल्यामुळे अरे-कारेने संबोधन, अपमानास्पद बोलुन वैयक्तीकरीत्या निलंबीत करणे, पगार बंद करण्याबाबत कायमच धमकावत असतात. अशाच प्रकारे काही कर्मचार्यांबाबत दिवाळी अग्रिम रोखून धरणे, पगार बंद करणे, पोलिसात खोटया साक्षीने तक्रार दाखल करणे व वैद्यकीय मंडळासमोर गरज नसतांना जाण्यास भाग पाडणे असे करुन सौ. घुगरी या कार्यकारी अभियंता पदाचा, अधिकाराचा अत्यंत दुरुपयोग करुन कर्मचार्यांना छळले जात आहे.