Monday, May 27, 2024
Homeक्रीडाइंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज

दिल्ली | Delhi

इंग्लंड महिला संघाची अष्टपैलू डॅनिअल वॅटने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला आहे. वॅटने इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर करून त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून डॅनिअल वॅट आणि जॉर्जी हॉज डेट करत होत्या.

- Advertisement -

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

या बामतीमुळे तिचे चाहते भलतेच आनंदात आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षावही करत आहेत. काही नेटकऱ्यांनी वॅटची फिरकी घेतली आहे. तर भारताच्या काही महिला क्रिकेटरनी देखील तिला साखरपुडयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. डॅनिअल वॅटचे भारतामध्येही खूप चाहते आहेत.

पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

डेनियल वॅटने टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीला प्रपोज केले होते. याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबतचा त्याचा फोटोही खूप चर्चेत आला होता. अलीकडेच ती महिला प्रीमियर लीग 2023 लिलावात विकली गेल्या नाही. 2014 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान व्याटने “कोहली मेरी मेरी” असे ट्विट केले होते.

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

वॅटने 2010 मध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. इंग्लंडसाठी 102 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 2 शतकांच्या मदतीने 1776 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने 143 टी-20 सामन्यांमध्ये 2 शतकेही केली आहेत. टी-20मध्‍ये 125.21 स्‍ट्राईक रेटने 2369 धावा आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात मधल्या फळीनंतर, तिने 2017 पासून सलामीला सुरुवात केली आणि या स्थानावर तिने इंग्लंडसाठी खूप धावा केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या