Saturday, May 4, 2024
Homeनाशिककाल्याच्या प्रसादाचा वानरराजाकडून आस्वाद

काल्याच्या प्रसादाचा वानरराजाकडून आस्वाद

चिचोंडी । Chinchodi

येथील यावर्षी सुरू असलेल्या 37 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या प्रसादात चक्क आज अचानक वानरराज अवतरले आणि महिलांच्या पंक्तीत बसून बजरंगबलीचा अवतार समजल्या जाणार्‍या वानरराजांनी लापशी, भात – आमटीच्या महाप्रसादावर ताव मारला.

- Advertisement -

यावेळी गावाच्या वतीने गोरखनाथ खराटे यांनी वानरराजांचा पुष्पहार घालून स्वागत सत्कार केला. जवळपास अर्धा तास महिलांच्या पक्तीत वानर राजांनी जवळपास पाच ते सात महिलांच्या पात्रातील अन्न आपल्या हातांनी सेवन केले.

येवला तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताहात चिचोंडी बुद्रुकच्या तीन तपांच्या या सप्ताहाचे सगळीकडे नाव निघते. इवलेशे रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी अश्या या सप्ताहाच्या या परंपरेत असे प्रथमच घडले की काल्याच्या प्रसादाला चक्क वानरराज प्रगटले. येथील हरिनाम सप्ताह 1984 पासून आजतागायत अखंडपणे सुरू आहे.

सोपान करंजीकर, लक्ष्मण मढवई यांच्या प्रेरणेने व रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या सप्ताहाला भक्ती, श्रद्धा, अखंडता आहे. करोनाच्या सावटाखाली सर्व नियमांचे पालन करत भक्तीभावाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या