Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedतीज कार्यक्रमाचा ऑनलाईन आनंद

तीज कार्यक्रमाचा ऑनलाईन आनंद

जळगाव – Jalgaon

‘रंगीलो सावन आयो, सुरंगों सावन आयो, आयो तीज त्योहार’म्हणत मोठ्या आनंद आणि हर्षोल्हासात तीज सण सर्व नियमांचे पालन करत आपापल्या घरीच हा सण साजरा केला.

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या तीजोत्सवात सहभागी स्पर्धकांनी स्वत: नियमांचे पालन करत इतरांनाही नियमांचे पालन करण्याचा संदेश देत ‘हरियाली तीज’चा सण ऑनलाईन online पध्दतीने साजरा करून आनंद घेतला.

अयोध्या नगर माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने तिजोत्सवानिमित्त ‘लिमडी माता’डेकोरेशन, स्पर्धकांचा स्वत: सोलह सिंगार, लिमडी माता किंवा तिज यावर एक उखाणा असे या ऑनलाईन स्पर्धेच्या अटी, नियम होते. या तीनही अटींचीत पुर्तता करणाऱ्या व त्याचा सुंदर असा एक मिनीटाचा व्हीडीयो बनवून पाठवायचा होता. यात १५ स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

सहभागी सर्वच स्पर्धकांची मेहनत बघता व त्यांनी पाठविलेले व्हीडीयो बघून परिक्षकांना स्पर्धकांची निवड करण्यासाठी परिक्षकांनाच परीक्षेला सामोरे जावे लागले.

यातील तीन स्पर्धकांची निवड करून त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस आयोजकांकडून देण्यात येणार आहे. निवड झालेल्यांमध्ये प्रथम क्रमांक

First prize नम्रता सोमानी Namrata somani, द्वितीय क्रमांक Second prize प्रिया झंवर Priya zawer, तृतीय क्रमांक Third prize साधना कामसट Sadhana kasat यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या स्पर्धकांना गौरी बिर्ला, चंचल तापडिया, ज्योती व्ही. मांडोरा यांचेतर्फे बक्षीस दिले जाणार आहे. अध्यक्ष साधना एस.लाहोटी, सचिव स्वाती एस.बियाणी यांनी स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या