Wednesday, April 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSonu Sood : अभिनेता सोनू सूदचा लातूरच्या 'त्या' शेतकरी दाम्पत्याला मदतीचा हात;...

Sonu Sood : अभिनेता सोनू सूदचा लातूरच्या ‘त्या’ शेतकरी दाम्पत्याला मदतीचा हात; म्हणाला, “आप नंबर भेजिए। हम…”

मंबई | Mumbai

महाराष्ट्र (Maharashtra) हे कृषीप्रधान राज्य असून, येथे शेतकरी वेगवेगळ्या सिझनमध्ये वेगवेगळी पिके घेतात. मात्र, याच कृषी प्रधान राज्यांमध्ये आजही काही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काहींना कसण्यासाठी जमीन आहे पण ती नांगरण्यासाठी बैल किंवा ट्रॅक्टरची सोय नाही. आजच्या काळात वाढत्या महागाईमुळे काही शेतकरी शेती देखील करत नाहीत. तर काही जण उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती (Farm) करताना बघायला मिळत आहे. पंरतु, ही शेती करतांना आजही शेतकऱ्याला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागतांना दिसत आहे.

- Advertisement -

अशाच एका अडचणीचा एक व्हिडीओ लातूरमधील (Latur) अहमदपूर तालुक्यातील (Ahamdpur Taluka) हाडोळती गावातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा बैलाऐवजी स्वतःला औताला जुंपून शेती करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अंबादास गोविंद पवार (६५) असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव असून, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या मदतीला बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) पुढे सरसावला आहे. त्याने ट्विटवर एक पोस्ट करत थेट आजोबांसाठी बैल पाठवतो असे म्हटले आहे.

सोनू सूदने पोस्टमध्ये, “आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं.” असे म्हटले आहे. या वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी सोनू सूदने दाखलेली माणुसकी पाहून सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे कौतुक होत आहे. तर अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करून त्याचे आभार मानले असून,काहींनी ‘बैल नको, ट्रॅक्टरच दे’ असेही त्याला सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेतावर भेट दिली. यानंतर त्यांनी सांगितले की, “सदर शेतकऱ्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नाही, हे निदर्शनास आले. यानंतर कृषी विभागाकडून त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचे आश्वासन दिले. तसेच पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना १.२५ लाख रूपयांपर्यंत अनुदान आणि शेतीसाठी आवश्यक साधने मिळणार आहेत, अशी माहिती देखील कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अंबादास पवार हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्याकडे असलेली अडीच एकर कोरडवाहू शेती करतात.पैशांची अडचण असल्याने त्यांना बैल घेणे शक्य नाहीत. तसेच खते, बियाणे घेण्याची आर्थिक ताकद त्यांच्याकडे नाही.परिणामी, शेती सुरू ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच औत ओढण्याचा मार्ग स्वीकारला आहे, तर त्यांच्या पत्नीने मागून नांगराची दिशा सांभाळण्याची जबाबदारी घेतली. सध्या या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या मदतीसाठी अनेक नागरिक आणि संस्था पुढे येत आहेत.

पावसाळी अधिवेशनातही गाजला मुद्दा

लातूरमधील या वृद्ध शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काल (बुधवारी) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या शेतकऱ्याला मदत मिळावी, अशी मागणी केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे देखील सांगितले. यावेळी विधानसभा संपूर्णपणे स्तब्ध झाल्याचे बघायला मिळाले होते. त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील या वृद्ध दाम्पत्याला फोन करून तुमचं कर्ज मी फेडतो अशी ग्वाही देत मदतीचा हात पुढे केला. तर बियाणे आणि खते देखील पाठवून देतो असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

अपघातात दोन ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon मालेगाव-कुसुंबा रोडवरील वडगाव बसथांब्याजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. एका ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम व कपडे...