मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai
बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला आहे. वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी हा चाकू हल्ला करण्यात आला असून घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने सैफवर हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तसेच तातडीने उपचार (Treatment) केल्यानंतर आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हा चाकू हल्ला केल्याचे बोलले जात आहे. तर घटनेनंतर वांद्रे पोलीस (Bandra Police) घटनास्थळी दाखल झाले होते. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने सैफवर तब्बल दोन ते तीनवेळा वार केल्याची माहिती मिळत आहे.
सैफच्या मानेवर वार, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं
अभिनेता सैफ अली खानच्या मानेवर तब्बल १० सेमीची जखम झाली आहे. तसेच घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. त्यानंतर सैफला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आले. तर पाठीत खूपसलेलं शस्त्र धारदार आणि टोकेरी होतं. सैफच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.