Wednesday, April 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAlia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टची Ex मॅनेजरने केली तब्बल 'इतक्या'...

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टची Ex मॅनेजरने केली तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई | Mumbai

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट (Allia Bhatt) हिची तिच्याच पर्सनल मॅनेजरने तब्बल ७७ लाखांची फसवणूक (Fraud) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आलियाची पूर्व मॅनेजर वेदिका शेट्टी हिला अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टी (Vedika Shetty) २०२१ मध्ये आलियाची पर्सनल सेक्रेटरी होती. तिने बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून ७६ लाख ९० हजार रुपयांची अफरातफर केली होती. यानंतर तब्बल पाच महिन्यांच्या शोधानंतर वेदिकला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

दरम्यान, आलिया भट्टची आई अभिनेत्री-दिग्दर्शिका सोनी राजदान (Soni Rajdan) यांनी जानेवारीत पोलीसात तक्रार केली होती. तर अटक केलेल्या वेदिका शेट्टी हिला पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत (Mumbai) आणण्यात आले आहे. त्यानंतर तिला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते.

आलियाच्या प्रोडक्शन हाऊसला धक्का

अभिनेत्री आलिया भट्ट दहाहून अधिक वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिच्या करिअरचा ग्राफ नेहमीच उंचावणारा ठरला आहे. तिची इंटर्नल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असून, कंपनीचे तसेच तिचे वैयक्तिक आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी पूर्व मॅनेजर वेदिका शेट्टी हिच्यावर होती.

ताज्या बातम्या

अपघातात दोन ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon मालेगाव-कुसुंबा रोडवरील वडगाव बसथांब्याजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. एका ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम व कपडे...