Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनडॉक्टर डॉनची भन्नाट गॅंग करतेय ट्रेंड फॉलो

डॉक्टर डॉनची भन्नाट गॅंग करतेय ट्रेंड फॉलो

लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या डॉक्टर डॉन या मालिकेने कमी काळात चांगली प्लारसिद्धी मिळवलेली दिसून येते. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई आणि त्याची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे….

या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील देवा आणि डॉक्टर मोनिका ही पात्रं तर त्यांच्या मनात घरकरून बसली आहेत. सोशल मीडियाद्वारे देखील या कलाकारांवर प्रेक्षक आणि चाहते प्रेमाचा वर्षाव करतात.

- Advertisement -

डॉक्टर डॉनच्या सेटवर ऑफस्क्रीन देखील कलाकार तितकीच धमाल करत असतात. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड्स पाहायला मिळतात. त्यातच सध्या चालू असलेला ट्रेंड म्हणजे तन्नू वेड्स मन्नू चित्रपटातील ‘साड्डी गली’ या गाण्यावर नेटिझन्स करत असलेला धमाल डान्स.

मग यात डॉक्टर डॉनचे कलाकार कसे मागे राहतील. म्हणून अनुराग वरळीकरने देवा, अजिंक्य आणि त्याचा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ खूपच रंजक असून त्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...