Friday, July 24, 2026
Homeमनोरंजनधक्कादायक! 'कुमकुम भाग्य' फेम प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने संपवलं...

धक्कादायक! ‘कुमकुम भाग्य’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने संपवलं आयुष्य; टोकाचं पाऊल उचलण्यामागे कारण काय?

मुंबई | Mumbai

टीव्ही मनोरंजन (Television Industry) क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी साडीने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. संचिताने इतके टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून तिचे चाहते आणि सह कलाकार धक्क्यात आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संचिता मुंबईजवळील (Mumbai) नालासोपारा परिसरातील (Nalasopara Area) अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. रविवारी संध्याकाळी ६:३० ते ७ च्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

संचिताने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडलेली नाही. या प्रकरणाचा सखोल तपास अचोले पोलीस करत असून, संचिताच्या कुटुंबीयांची आणि जवळच्या मित्रांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तिच्या या आत्महत्येमागे व्यावसायिक ताणतणाव होता की काही वैयक्तिक कारण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये केले होते काम

एक तरुण आणि आश्वासक अभिनेत्री म्हणून संचिता उगले हिने सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले होते. तिने अनेक लोकप्रिय हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. कुमकुम भाग्य’, ‘दिलवाली दुल्हा ले जायेगी’ आणि ‘वागळे की दुनिया’. ‘वागळे की दुनिया’ या गाजलेल्या मालिकेत तिने साकारलेली ‘रुचिता’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. तसेच तिने ‘सायलेन्स २’ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ‘छावा’ सारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘रंगबाजी दिलों की’ आणि प्रसिद्ध निर्माती ‘गुल खान’ यांच्या प्रोजेक्ट्समध्येही तिने काम केले होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...