Monday, April 28, 2025
Homeमनोरंजनभूषण, रिया, सायली झाले 'मनमौजी'

भूषण, रिया, सायली झाले ‘मनमौजी’

लॉकडाऊनच्या काळात इतर विषयांची चर्चा होत असतानाच आणखीन एक चर्चेचा विषय बनला होता. तो म्हणजे ‘मनमौजी’ चित्रपटाचा.

जेव्हापासून गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची सोशल मीडियावर अधिकृत घोषणा केली तेव्हापासूनच खरंतर या चर्चेला उधाण आले होते. यापूर्वी गोल्डन गेट मोशन पिक्चर्सने ‘गुलाबजाम’, ‘लॉस्ट अँड फाउंड’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली असल्याने ‘मनमौजी’मध्येही काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

‘मनमौजी’मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ‘हँडसम हंक’ भूषण पाटील, रॅम्पवर आपल्या फॅशनचा जलवा दाखवणारी, शास्त्रीय नृत्यांगना, अभिनेत्री रिया नलावडे आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या सर्वांनीच आपल्या अप्रतिम अभिनयाने स्वत:ची एक छबी निर्माण केली आहे. एकंदरच हा एक रोमँटिक सिनेमा असल्याचे कळते.

प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटाचे निर्माता विनोद मलगेवार असून चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन शितल शेट्टी यांनी केले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांच्या गाण्यांना अमितराज यांचे संगीत लाभले आहे.

चित्रपटाच्या डिओपीची धुरा प्रसाद भेंडे यांनी सांभाळली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांना काहीतरी चांगले आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार हे नक्की!

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...