Thursday, October 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNana Patekar Death : "अस्वस्थ वाटल्याने मित्राला मेसेज केला, रुग्णालयात नेत असतानाच..";...

Nana Patekar Death : “अस्वस्थ वाटल्याने मित्राला मेसेज केला, रुग्णालयात नेत असतानाच..”; नाना पाटेकरांसोबत मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी सगळंच सांगितलं

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे. गोव्यातील (Goa) डोना पावलामधील घरी त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर नाना यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, पहाटे ५.२० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

नाना पाटेकर यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना सलग ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला.मात्र, त्यांना वाचवण्यात यश आले नाही. या प्रकरणी मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली असून,मृतदेहाचे (Dead Body) शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती मणिपाल रुग्णालयाचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली. दरम्यान नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या क्षणांबाबत देखील मणिपाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डॉक्टर काय म्हणाले?

मध्यरात्री साधारणता २.३० वाजता नाना पाटेकर यांनी आपल्या एका मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी मित्राने तो मेसेज पाहिला नव्हता. पहाटे जेव्हा त्याच्या निदर्शनास हा मेसेज आला, तेव्हा त्याने तातडीने नाना पाटेकर यांच्या घरी धाव घेतली. ज्यावेळी मित्र घरी पोहोचला तेव्हा नाना पाटेकर यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर केअरटेकर आणि मित्राने तातडीने मदत घेत त्यांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली.

त्यांना रुग्णालयात नेत असतानाच सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया) सुरू करण्यात आली. ज्यावेळी आमच्या टीमने सीपीआर चालू केला त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेतच नेण्यात आले, असे डॉक्टरांनी म्हटले. नाना पाटेकर जेव्हा रुग्णालयात पोहोचले तेव्हा पहाटचे ४.२० ते ४.३० वाजले होते. त्यानंतर रुग्णालयातील टीमने शक्य तितक्या वेगाने उपचार सुरू केले. डॉक्टर आणि त्यांच्या टीमने मिळून जवळपास ४५ मिनिटे सीपीआर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर ५.२० च्या सुमारास नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली.

ताज्या बातम्या

सयाजी

Nana Patekar Passes Away: हे खरोखरच धक्कादायक आहे…नाना पाटेकरांच्या निधनाने सयाजी...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८...