Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBigg Boss Marathi Winner : कोकण कन्या तन्वी कोलते ठरली 'बिग बॉस...

Bigg Boss Marathi Winner : कोकण कन्या तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ ची विजेती; ट्रॉफीसह किती पैसे मिळाले?

अभिनेता राकेश बापट 'बिग बॉस मराठी सिझन ६' चा उपविजेता

मुंबई | Mumbai

बिग बॉस मराठी सिझन ६ ची (Big Boss Marathi 6) ११ जानेवारी २०२६ रोजी कलर्स मराठी या वाहिनीवर सुरुवात झाली होती. या सिझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये एकूण १७ सदस्य १०० दिवस १०० कॅमेरांच्या नजरकैदेत राहिले. या घराने आणि महाराष्ट्राने (Maharashtra) सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग बघितले. काल (दि.१९ एप्रिल) रोजी बिग बॉस मराठी सिझन ६ ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. १०० दिवसांच्या या खेळात पाचही स्पर्धकांनी आपली जागा निर्माण केली होती.त्यामुळे टॉप पाच स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या.

- Advertisement -

अखेर तगड्या स्पर्धकांना मागे टाकत बिग बॉस मराठी सिझन ६ ची तन्वी कोलते (Tanvi Kolte) हि विजेती ठरली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि उत्कृष्ट टास्क परफॉर्मन्समुळे तिने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यामुळे तन्वी कोलतेवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अभिनेता रितेश देशमुखे (Actor Ritesh Deshmukh) याने होस्ट केलेला यंदाचा बिग बॉसचा सिझन प्रचंड गाजला. विशेष म्हणजे भाऊचा धक्का या एपिसोडला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले. टॉप पाच स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन हे स्पर्धक होते. पाचही स्पर्धकांनी मास्टरमाईंडने प्रत्येक टास्क पूर्ण केले.शेवटी दोन स्पर्धक उरले होते. यानंतर तन्वी कोलतेने सहाव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता राकेश बापट हा बिग बॉस मराठी सिझन ६ चा उपविजेता ठरला आहे.

दरम्यान, बिग बॉस मराठी सिझन ६ ची विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलते हिने माध्यमांना (Media) दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते”,असे तिने सांगितले.

तन्वीला ट्रॉफीसह किती पैसे मिळाले?

बिग बॉसच्या विजेतेपदासोबत तन्वी कोलतेला कलर्सकडून १५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याचसोबत पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे तब्बल १० लाख रुपयांचे व्हाऊचर आणि तुनवाल ई मोटर्सची लिथीनो प्रो ही ई बाईक देण्यात आली. याशिवाय बिग बॉस मराठीचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख यांच्याकडून आणि ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटोही तन्वीला देण्यात आला.

तन्वी कोलते कोण आहे?

तन्वी कोलते ही मुळची रत्नागिरी येथील असून, ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते. इंस्टाग्रामवर रील्स, फॅशन, लाइफस्टाइल आणि रिलेटेबल व्हिडीओमुळे ती प्रामुख्याने प्रसिद्ध झाली.तन्वीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिजिटल कंटेंट क्रिएशनकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने छोटे व्हिडिओ आणि ट्रेंडिंग रील्स बनवून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर तिच्या एक्सप्रेसिव्ह स्टाइल आणि नैसर्गिक अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तन्वीच्या फॅशन आणि लाइफस्टाइल कंटेंटमुळे तरुणांमध्ये मोठा फॅनबेस तयार झाला आहे.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...