Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी तीन संशयित ताब्यात; मुंबई...

Tiger Shroff Attack : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणी तीन संशयित ताब्यात; मुंबई अन् कोटा पोलिसांची संयुक्त कारवाई

मुंबई | Mumbai

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर जुहू येथे रविवारी (दि.१८) रोजी गोळीबार (Firing) करण्यात आला होता. या हल्ल्यात सुदैवाने टायगर श्रॉफ (Tiger Shroff) थोडक्यात बचावला. मात्र, त्यांच्या हाताला गोळी चाटून निघून गेली. तर त्याचा कार चालक (फिरदौस) आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. दरम्यान या जीवघेण्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवघ्या १७ तासांत मोठी कारवाई केली आहे.

- Advertisement -

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुंबई आणि कोटा पोलीसांनी (Kota Police) संयुक्त कारवाई करत सुरत एक्सप्रेसमधून आणि राजस्थानमधील कोटा येथून तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.यातील दोघे हरियाणाचे आणि एक जण बिहारचा असल्याचे समोर आले आहे. मात्र, हे संशयितच (Suspected) मुख्य हल्लेखोर आहेत का? याबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत पुष्टी किंवा त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “हे डरपोक लोक लपून…”; CM फडणवीसांची टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया

तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग

दरम्यान, या हल्ल्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला असून, आरोपींनी हल्ल्यापूर्वी रेकी केल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी मुख्य हल्ल्यापूर्वी टायगर श्रॉफचे घर आणि तो खेळायला जात असलेल्या फुटबॉल मैदानाची रेकी केली होती, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही रेकी करणारी टीम वेगळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फॉरेन्सिक तपासात हल्लेखोरांनी ‘गावठी पिस्तुलाचा’ वापर केल्याचा संशय आहे. कारवर एकूण ७ ते ८ गोळ्या झाडल्या गेल्या, त्यापैकी काही गोळ्या कारला लागल्या तर दोन गोळ्यांचे लक्ष चुकले. या हल्ल्यात कारचालक आणि एक चाहते जखमी झाले आहेत.

सुरक्षेत वाढ

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर (कार्टर रोड) पोलीस बंदोबस्त व सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर मुंबई गुन्हे शाखा आणि जुहू पोलिसांची १५ विशेष पथके या प्रकरणाचा कसून तपास करत असून, यामागील मास्टरमाइंड आणि कटाचा पर्दाफाश लवकरच केला जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

रविवार संध्याकाळी जुहूच्या पुष्पा पार्क परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर अंधाधुंद गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले होते. त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकी सोडून लोकलने बोरिवली गाठले आणि तिथून सुरत एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत होते. मुंबई पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत सुरत एक्सप्रेसमधून संशयितांना ताब्यात घेतले. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरूनही पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Manoj Jarange : “भाजप तुम्हाला संपवतोय की…”; मनोज जरांगेंचा DCM शिंदेंवर...

0
बीड | Beed मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीड जिल्ह्यातील (Beed District) प्रसिद्ध नारायण गडावरील दसरा मेळाव्यात महायुती सरकार (Mahayuti...