Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAchyut Potdar Death : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार कालवश; सिनेसृष्टीवर शोककळा

Achyut Potdar Death : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार कालवश; सिनेसृष्टीवर शोककळा

मुंबई | Mumbai

बॉलिवूडसह (Bollywood News) मराठी चित्रपटामध्ये आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Marathi Actor Achyut Potdar) यांचं वयाच्या ९१ वर्षी निधन झालं आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय सेना आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केल्यानंतर पोतदार यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

- Advertisement -

अच्युत पोतदार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आणि डझनांहून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांनी गोविंद निहलानी, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सूरज बडजात्या आणि राम गोपाल वर्मा यांसारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले. आक्रोश, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, राजू बन गया जेंटलमन, दिलवाले, रंगीला, मृत्युदंड, इश्क, वास्तव, हम साथ साथ हैं, परिणीता, लगे रहो मुन्ना भाई, दबंग 2, थ्री इडियट्स आणि व्हेंटिलेटर यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.

दरम्यान, पोतदार यांच्या पार्थिवावर आज (दि.१९ ) रोजी ठाण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अच्युत पोतदार यांना त्यांच्या नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयासाठी नेहमीच लक्षात ठेवले जाईल. ‘3 इडियट्स’मधील त्यांची छोटीशी भूमिकाही लोकांच्या मनात कायम घर करून राहिली आहे. त्यांचा डायलॉग आजही सोशल मीडियावर (Social Media) मीम्सच्या माध्यमातून वापरला जातो.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : खून करण्यासाठी मिटिंग प्रकरण; शेखर निकमच्या ताब्याला...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik फुलेनगरातील सागर जाधव (Sagar Jadhav) याच्यावर झालेल्या गोळीबार व हत्येचा कट रचल्यामागील सूत्रधार मानला जाणारा अमरावती मध्यवर्ती कारागृहातील (Amravati Central...