Sunday, May 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात...

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु होते उपचार

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. त्यांना काल (शनिवारी) रात्री हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या एका विशेष पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, काही वेळापूर्वीच त्यांचे निधन झाले. आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये झाला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या बहिण होत्या. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) हे अभिनेते व गायक होते तर आई शिवाताई मंगेशकर गृहिणी होत्या. आशा भोसले यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांची मुलगी वर्षा (पत्रकार) हिने आत्महत्या केली होती तर मुलगा हेमंत भोसले यांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. तर त्यांचा दुसरा मुलगा आनंद भोसले आणि नात जनाई भोसले ही देखील गायिका आहे. आशा भोसले यांनी १९४३ मध्ये मराठी गाण्यांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

दरम्यान, आशा भोसले यांनी सुमारे आठ दशकांच्या कारकि‍र्दीत हजारो गाणी (Songs) गायिली. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवला. ‘दम मारो दम’, ‘रमैया वस्तावैया’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘ये मेरे वतन के लोगो’ (बॅकग्राउंड), ‘क्या करें’ सारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवले होते. त्यांना ‘आशा ताई’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या खास आवाजातील ऊर्जा, विविधता आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ आणि ‘Queen of Indipop’ अशा उपाधी मिळाल्या होत्या. त्यांच्या गाण्यांनी अनेक दशकं संगीतप्रेमींवर अधिराज्य गाजवले.

मुलाने दिली निधनाची माहिती

आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले (Aanad Bhosle) यांनी माध्यमांसमोर येत आईच्या निधनाची बातमी दिली. ते म्हणाले की, “माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येईल. त्यांचं पार्थिव राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत उद्या (सोमवारी) दुपारी ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयात असून, या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Rupali Chakankar : नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक...

0
नाशिक | Nashik भोंदू अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची...