Saturday, May 4, 2024
Homeजळगावमतदानासाठी मतदारांचा उत्साह

मतदानासाठी मतदारांचा उत्साह

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात आज ७८३ ग्रामपंचायतींपैकी ६८७ ग्रा.प.साठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून आज मतदानास सुरूवात झाली. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदार नागरीकांसह महिलांची देखिल मतदान करण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी दिसून आली. सकाळी साडे नउ वाजेपर्यत जवळजवळ बारा टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात ७८३ ग्रा.पं.पैकी ९२ ग्रा.पं.बिनविरोध झाल्या असून आज ६८७ ग्रामपंचायतीसंाठी मतदान प्रकिया घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठया व प्रतिष्ठीत लढत असलेल्या ग्रामपंचायतींत मतदान करण्यावर नागरीकांचा भर दिसून आला. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात सरासरी १२.५६ टक्क्यांसह सर्वात जास्त टक्केवारी जळगाव १७.१९ टक्के मतदान झाले आहे. त्या खालोखाल धरणगांव तालुक्यात १४.७२ टकके तर सर्वात कमी मतदान टक्केवारी ४.८९ टक्के एरंडोल तालुका परीसरात दिसून आली आहे.

जळगाव तालुक्यात मतदानाची टक्केवारी आघाडीवरच

सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२.२५ तर जळगाव तालुक्यात ३७.११ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात आज ७८३ ग्रामपंचायतींपैकी ६८७ ग्रा.प.साठी मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून आज मतदानास सुरूवात झाली. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदार नागरीकांसह महिलांची देखिल मतदान करण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी दिसून आली.

विशेषतः जळगाव तालुका मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर असून सकाळी साडे अकरा वाजेपर्यत ३७.११ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल धरणगांव तालुक्यात ३४.८५, भडगांव तालुक्यात २६.११ तर पाचोरा तालुक्यात देखिल २६ टक्के मतदान टक्केवारी नोंदविण्यात आली आहे. जामनेर ३३.१८, एरंडोल २९.९४,पारोळा ३४.५१, भसुावळ २५.८५, मुक्ताईनगर ३४.३६, बोदवड, ३०.१८, चाळीसगांव ३३.८५, यावल २९.०२, रावेर ३४.४३, अमळनेर १७.३७, चोपडा १६.७५ असे सकाळी साडे अकरा वाजेपर्यत एकूण २२.२५ टक्के सरासरी मतदान झाले असल्याचे नोडल अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या