Sunday, April 27, 2025
Homeमुख्य बातम्या'देशदूत' नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘देशदूत’ नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील शेकडो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो-२०२४’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून नवीन नाशिक आणि परिसरातील नागरिकांनी ‘वीकएण्ड’ चा पुरेपूर आनंद घेतला.

- Advertisement -

‘देशदूत’ आयोजित तसेच भाविक ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत, सहप्रयोजक राजश्री प्रॉपर्टीज्, ‘नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ मध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत.

दुपारपासून गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. नवीन नाशिक परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. पपायाज् नर्सरी एक्सपोची पर्यावरण पार्टनर आहे. उद्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सर्वांना खुला प्रवेश आहे.

मान्यवरांची भेट

मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश कार्यकारिणी विद्यार्थी सेना सदस्य बाजीराव मते, नाशिक तालुका उपाध्यक्ष धनंजय शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अमित गांगुर्डे, मनसे नेते सौरभ पाळदे, नवीन नाशिक विभाग अध्यक्ष नितीन माळी, ज्येष्ठ मनसे नेते मनोज जोशी, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष रोहन जगताप या मान्यवरांनी एक्स्पोला हजेरी लावत विकासकांच्या स्टॉलला भेट दिली व माहिती जाणून घेतली.

स्टॉलधारकांनी केले ‘देशदूत’चे कौतुक

अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रमाणात आम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याचे सहभागी स्टॉलधारकांनी सांगितले. एक्स्पो पासून अगदी जवळच अनेक साईट सुरू आहे, त्यामुळे त्वरित साईट व्हिजिटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना आपल्या बजेटमध्ये असलेले व दर्जेदार प्रकल्प खूप आवडले असून, अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदविल्याचेही स्टॉलधारक म्हणाले. ‘देशदूत’ने ग्राहकांपर्यंत पोहचण्याची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी आभार मानले.

ग्रामीण शहरी भागात ‘देशदूत’ने विणलेले जाळे व बातम्यांची घेण्यात येणारी दखल याचबरोबर देशदूत राबवत असलेल्या नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्सो मधून सामान्य जनतेला आपल्या घराचे स्वप्न साकार करता येणार आहे. व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांना मिळणारी पसंती व चॉईस ‘देशदूत’च्या एक्सपोच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यामुळे निश्चितच ‘देशदूत’ चा हा उपक्रम सर्वसामान्यांच्या स्वप्नाला आकार देणारा ठरेल. यापुढेही ‘देशदूत’ने उपक्रम राबवून आपले सामाजिक बांधीलकी जोपासवी. सदिच्छा व अभिनंदन.

-सुदाम कोंबडे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...