Friday, May 31, 2024
Homeजळगावधरणगाव येथे आज उद्योजकता प्रशिक्षणासह कर्ज मेळावा

धरणगाव येथे आज उद्योजकता प्रशिक्षणासह कर्ज मेळावा

धरणगाव, प्रतिनिधी dhule

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धरणगाव येथे मंगळवार दि.११ जुलै रोजी उद्योजकता प्रशिक्षणासह कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

शहरातील महावीर पतसंस्थेच्या सभागृहात सकाळी १० वाजता कर्ज मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद् घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान प्रमाणपत्र वाटप व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा अर्ज मोफत पोर्टलवर भरून दिला जाणार आहे. यासाठी लाभार्थींनी येतांना शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, जातीचा दाखला, प्रकल्प अहवाल, पॅन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाकडून जळगावचे जिल्हा उद्योग केंद्र राबवत आहे. या योजनेतून लाभार्थींना १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान शासन देणार आहे.

धरणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे तालुका समन्वयक समीर भाटिया यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या