Wednesday, May 21, 2025
Homeनगरसमन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आज प्रशासकिय आढावा बैठक

समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आज प्रशासकिय आढावा बैठक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अनुषंगाने नगर, नाशिक जिल्ह्यातील पाणी सोडण्याबाबत आज मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकिय पातळीवर बैठक होत आहे. या बैठकीत नगर, नाशिकच्या धरणातील पाणीसाठे व जायकवाडी जलाशयातील पाणीसाठा याचा व त्या अनुशंगाने विविध गोष्टींचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांचे दालनात आज दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आढावा बैठक ठेवण्यात आलेली आहे. सदर बैठकीत नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या धरणांतील 15 ऑक्टोबरचे पाणीसाठे, दि.1 जुलै 2023 पासून झालेला खरिपातील पाणी वापर, बाष्पीभवन व इतर अनुषंगिक विषयाबाबत आढावा घेतला जाईल. सदर बैठकीस नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित राहतील.

ही बैठक प्रशासकीय पातळीवर होणार असून या बैठकीतील प्रस्ताव शासन मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविण्यात येईल. प्रस्ताव तयार करताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे दि.14/9/2014 चे निर्देश तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे दि.23/9/ 2016 च्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात येईल. समन्यायी पाणी वाटपा संदर्भातील मेंढेगिरी अहवालात नमूद केलेला पर्याय क्रमांक 3 विचारात घेतला जाऊ शकतो, 65 टक्के पाणीसाठा म्हणजे 50 टीएमसी पाणी जायकवाडीत हवे! अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

शासन स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. या सर्व प्रक्रियेस दहा दिवसांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाविस्तार-एआय अ‍ॅप’चे लोकार्पण

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai कृषी विभागाने विकसित केलेल्या 'महाविस्तार एआय अ‍ॅप'; चे लोकार्पण आज करण्यात आले. याबाबतची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. महाविस्तार अ‍ॅपवर शेतीबाबत...